Maharashtra Rain Alert | राज्यातील या 25 जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा नवीन अंदाज पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Alert | राज्यात सध्या पावसाचं नाट्य वेगळ्याच रांगात रंगलेला दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने मराठवाड्यात विश्रांती घेतली तर कोकणामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालेला आहे. अशातच पुन्हा पावसाने जोर पकडला असून आता महाराष्ट्रातल्या तब्बल 25 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केलेला आहे. पुढील 24 तासात अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागात मुसळधार (Heavy rain) पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली. Maharashtra Rain Alert

कोकणात धोक्याची घंटा! (Heavy rain likely in Konkan)

भारतीय हवामान विभागाने (IMD) पुन्हा एकदा कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान खात्याने (Meteorological Department) ऑरेंज अलर्ट (Orange Alert) दिलेला असून मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. ढगाळ वातावरण आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस मुंबई परिसरात जाणवत आहे.

उत्तर महाराष्ट्रात हवामान खात्याचा येलो अलर्ट

हवामान विभागाने अहिल्यानगर वगळता उत्तर महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार (Possibility of heavy rain) पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे कोल्हापूर सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मध्यम तेजोर दर पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर सातारा घाट परिसरामध्ये ऑरेंज Alert देण्यात आलेला असून पुणे कोल्हापूर साठी येलो अलर्ट आहे. घाटमातेचे भाग विशेष सतर्क राहावे तशी सूचना जारी करण्यात आलेला आहे.

तर मराठवाड्यातील बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर परभणी आणि नांदेडमध्ये मुसळधार (Heavy rain) पावसाची दाट शक्यता हवामाना विभागाने वर्तवली आहे.

तर विदर्भामध्ये अतिवृष्टीचा धोका निर्माण झाल्या असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे, यवतमाळ, वाशिम, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या आठ जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. तुफान वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. तर अकोला जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

राज्यामध्ये आठ जुलै 2025 रोजी जोरदार पावसाची शक्‍यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, येत्यात तीन दिवसात पावसाचा जोर राज्यभर कायम राहणार आहे. नदी नाल्यांच्या पातळीत वाढ, विजांचा कडकडाटात, वाऱ्यांचा जोर हे सगळं पाहता शाळकरी मुले, शेतकरी, आणि वयोवृद्ध नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Leave a Comment