Maharashtra Havaman Andaj: महाराष्ट्रात हवामान बिघडलं! या तारखेपासून होणार अवकाळी पावसाला सुरुवात; वाचा सविस्तर

Maharashtra Havaman Andaj
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Havaman Andaj: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. आता अचानक राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झालेल्या असून राज्यात 25 ते 28 डिसेंबर दरम्यान पाऊस पडणार असा हवामान अंदाज भारतीय हवामान खात्यासह राज्याचे ज्येष्ठ हवामान अभ्यासात पंजाबराव यांनी वर्तवलेला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची चांगलीच फजिती उडणार आहे तर कोणत्या जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा दिला आहे आपण जाणून घेऊया. Maharashtra Havaman Andaj

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात उत्तर भारताकडून थंड वारे येत आहेत यासोबत दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे सुद्धा येत आहेत दरम्यान याच थंड आणि बाष्पयुक्त वाऱ्यामुळे वातावरणाच्या वरच्या थरांवर झोतवारा वेगाने वाहत आहे.

त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे बोचरी थंडी आणि दाट धुके आणि पावसाचे वातावरण तयार झालेले आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने याच पार्श्वभूमीवरती आज काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलेला आहे. भारती हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे.

त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन त्यांच्याशी तू पकांची व्यवस्थित प्रकारे नियोजन करायचा आहे भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली असल्याने राज्यातील कांदा, गहू, हरभरा, पिकावरती अळी कीड बुरशी माव्याचा प्रभाव पाहायला मिळू शकतो.

तसेच द्राक्ष बागांवरही दमट हवामानाचा विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भीती कृषी क्षेत्रातील जाणकाराकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असे देखील आव्हान यावेळी करण्यात आलेले आहे.

One thought on “Maharashtra Havaman Andaj: महाराष्ट्रात हवामान बिघडलं! या तारखेपासून होणार अवकाळी पावसाला सुरुवात; वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *