mahahsscboard.in | दहावीच्या परीक्षेचा निकाल ही गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आयुष्याच्या एका महत्वाच्या वळणावरचा टप्पा असतो. याच कारणामुळे लाखो विद्यार्थी आणि पालक दरवर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटकडे डोळे लावून बसलेले असतात. यंदाही 2025 साली दहावीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम mahahsscboard.in या बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
त्यानंतर होमपेजवर ‘महाराष्ट्र SSC Result 2025’ अशी लिंक दिसेल, त्यावर क्लिक करताच नवीन पेज उघडेल. त्या पेजवर उमेदवारांनी आपले रोल नंबर आणि आईचे नाव यासारखे लॉगिन तपशील भरून ‘सबमिट’ बटणावर क्लिक करावे. काही क्षणात तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. निकाल पाहिल्यानंतर त्याची सॉफ्ट कॉपी डाऊनलोड करून एका सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावी आणि भविष्यातील वापरासाठी त्याची हार्ड कॉपी नक्की काढून ठेवावी, कारण कॉलेज अॅडमिशन, शिष्यवृत्ती, किंवा इतर शैक्षणिक प्रक्रिया यासाठी त्याची गरज भासू शकते.
या वर्षीचा निकाल जरी प्रतीक्षेत असला, तरी मागच्या वर्षीचा म्हणजेच 2024 मधील निकालाची कामगिरी बरीच उल्लेखनीय होती. 2024 मध्ये दहावीचा निकाल 27 मे रोजी घोषित करण्यात आला होता आणि एकूण 15 लाख 60 हजार 154 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नावनोंदणी केली होती. यापैकी 15 लाख 49 हजार 326 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर त्यामध्ये तब्बल 14 लाख 84 हजार 431 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. एकूण उत्तीर्णतेचा टक्का 95.81 टक्के इतका होता. या निकालात मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली होती, कारण त्यांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का 97.21 टक्के इतका होता, तर मुलांचा टक्का 94.56 टक्के होता. कोकण विभागाने 99.01 टक्के निकालासह संपूर्ण राज्यात आघाडी घेतली होती, तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजेच 94.73 टक्के होता.
दरम्यान, यावर्षी 12वीचा निकाल आधीच 5 मे रोजी जाहीर करण्यात आला असून त्यात देखील मुलींनी बाजी मारली आहे. 12 वीचे एकूण उत्तीर्णतेचे प्रमाण 91.88 टक्के इतके असून त्यामध्ये मुलींचा टक्का 94.58 आणि मुलांचा 89.51 इतका होता. या निकालाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत आणि अनेकांचे भविष्य त्यावर ठरणार असल्याने सगळ्यांचे लक्ष आता निकालाच्या तारखेवर खिळले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा, आपल्या रोल नंबरची माहिती तयार ठेवावी आणि निकाल जाहीर होताच बोर्डाच्या संकेतस्थळावर वेळ वाया न घालवता प्रवेश करून आपला निकाल पाहावा. कारण हा निकाल म्हणजे केवळ एका परीक्षेचा शेवट नसून एका नव्या शिक्षणप्रवासाची सुरुवात आहे.
हे पण वाचा | दहावीच्या निकालाची तारीख जाहीर..! 27 मे ला लागणार दहावीचा निकाल, येथे पहा ऑनलाईन