MahaDBT Farmer Update: राज्यातील अनेक महत्त्वपूर्ण शेतकरी योजना या महाडीबीटी द्वारे चालवल्या जातात. या पोर्टलवर अर्ज केल्यानंतर पोर्टलच्या अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मात्र अनेक योजनेबाबत सरकारची उदासीनता दिसून येत आहे. योजनेचे लॉटरी न लागणे, लागलेल्या लॉटरीचे पूर्व समिती न देणे आणि अनुदानाचे वितरण न होणे अशा अनेक समस्या सरकारकडून उपस्थित होत आहेत.
महाडीबीटी अंतर्गत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या विहीर योजनेत अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. शेतकऱ्यांकडून या योजनेसाठी लॉटरी कधी लागणार याबाबत वारंवार प्रश्न विचारला जात आहे. यामध्ये पाहिलं तर एकात्मिक फुलोत्पादन, बियाणे अर्ज योजना सिंचन, तुषार अशा अनेक वेगवेगळ्या योजना आहेत. MahaDBT Farmer Update
हे पण वाचा | आधार कार्डवर नवीन नियम लागू! सर्वांसाठी जाणून घेणे खूपच महत्त्वाचे..
या सर्व योजनेसाठी केंद्र सरकारकडून निधीदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. यातून काही जुन्या योजनांचा अनुदान वितरित करण्यात आले आहे. यानंतर नवीन योजनेबाबत काय अपडेट आहे. तर याबाबत आता शेतकऱ्यांना मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे. Solar powered spray pump Yojana
दरम्यान महाडीबीटी द्वारे सर्वात जास्त सौरचलित फवारणी पंप यंत्र योजनेसाठी सर्वात अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. या योजनेबाबतचे मेसेज शेतकऱ्यांना येण्यास सुरुवात झालेली आहे. जर तुम्हाला मेसेज येत असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर जाऊन याची सहानिशा करावी लागणार आहे. जर शासन लॉटरी अनुदान वितरित करत असेल तर याबाबत पूर्वसंमती घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्जाची स्थिती तपासणी आवश्यक आहे.
हे पण वाचा | सोनं झालं स्वस्त; सोने खरेदीची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचे दहा ग्रॅम दर
अर्जाची स्थिती कशी तपासावी?
शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सौर चलित फवारणी पंप या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला एसएमएस आला असेल. तर तुम्ही महाडीबीटी पोर्टल वर लॉग इन करून याची स्थिती तपासून घ्यावी. अर्जाची स्थिती तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर जावे लागेल. त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर टाकून लॉगिन करावे लागेल. त्यानंतर मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्या ठिकाणी मंजूर झालेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करावे लागेल. या ठिकाणी तुम्ही अर्ज केलेल्या बाबी दाखवत असेल तर तुमचा अर्ज मंजूर झाला आहे. जर तुमचा अर्ज छाननीअंतर्गत दाखवत असेल तर तुमचा अर्ज आणखीन मंजूर झालेला नाही. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा