Lpg Gas Cylinder Price | एक ऑक्टोबर म्हणजे महिन्याची सुरुवात आणि या दिवशी सर्वसामान्यांच्या खिशावरती पुन्हा एकदा झळ बसणार आहे. नुकतीच जीएसटी कपातून लोकांना थोडा दिलासा मिळाला होता, पण आता दसऱ्याच्या अगदी आधीच पेट्रोलियम कंपनीने गॅस सिलेंडरचे दर वाढवून पुन्हा लोकांच्या आशांवरती पाणी फिरवलं. देशातील तीन मोठ्या सरकारी तेल कंपन्या आयओसी, एचपीसीएल, आणि बीपीसीएल यांनी 19 किलो वजनाच्या व्यवसाय सिलेंडरची किंमत वाढवली आहे. आज म्हणजे एक ऑक्टोबर दिवशी सकाळी सहा वाजल्यापासून हे नवीन दर लागू झाले आहेत. सलग पाच महिन्यांपासून हा सिलेंडर स्वस्त होता, पण आता त्यात तब्बल 15.50 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत हा व्यवसाय सिलेंडर आता 1547 रुपयांना मिळणार आहे. Lpg Gas Cylinder Price
या नवीन झालेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. कारण रेस्टॉरंट असो हॉटेल असो किंवा छोटीशी खानावळ असो हे सर्व सिलेंडरवरच चालतं. त्यामुळे आता बाहेर खान महाग होणार हे निश्चित. आधीच लोक सणासुदीच्या काळात खर्चाचा ताळमेळ लावतात आणि त्यात अशी वाढ झाली की थेट सामान्यांच्या खिशावर ताण पडतो. महागाईचा फटका आधीच बसलेला असताना आता या दरवाढीमुळे लहान मोठे व्यापारी, हलवाई यांच्यासमोर मोठा संकट उभा राहिला आहे.
यावेळी घरगुती सिलेंडर मात्र स्थिर ठेवण्यात आला आहे. मुंबईमध्ये 14 किलो घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत अजूनही 852 रुपयांना आहे. पण लक्षात ठेवा, या किमतीत शेवटची सुधारणा 8 एप्रिल रोजी झाली होती. लोकांना आशा होती की सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडर स्वस्त होईल, किमान घरगुती दर तरी कमी केले जातील. पण तेल कंपन्यांना आणि सरकारकडून कोणतेही दिलासा मिळाला नाही. उलट व्यावसायिक सिलेंडरच्या भाववाढीमुळे हॉटेलमध्ये मिळणारा डोसा, वडा पाव पासून ते थाळीपर्यंत सगळं महाग होणार आहे.
यासोबतच विमान इंधनाचा (AT) किमतीत ही बदल करण्यात आला आहे. दिल्लीत प्रतिलिटर दरवाढ होऊन तो आता 813.44 रुपये झाला आहे. म्हणजे प्रवास महाग, स्वयंपाक महाग आणि रोजच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट महाग होण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत.
सणसदीच्या काळामध्ये गॅस सिलेंडरचे दर वाढल्याने सर्वसामान्यांना चांगलाच मोठा फटका बसलेला आहे. परंतु जीएसटी कपातीचा गोडवा अजून चाखता ही नाही आला तरच महागाई झपाट्याने वाढत आहे. महागाईचे या खेळात मात्र फटका सर्वसामान्यांना बसतोय हे सिद्ध झाल आहे.
हे पण वाचा | एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घसरण! 1 जुलैपासून लागू नवीन दर, पहा तुमच्या शहरात किती रुपयाला मिळणार?