सर्वसामान्य नागरिकांना मोदी सरकारची भेट..! या तारखेला मिळणार LPG सिलेंडरचे अनुदान, सरकारवर 12000 कोटीचा बोजा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Cylinder Price: नमस्कार मित्रांनो मोदी सरकारने LPG सिलेंडर वर अनुदान एक वर्षासाठी वाढवले आहे. पीएम उज्वल योजनेचा लाभार्थ्यांना 31 मार्च 2025 पर्यंत LPG सिलेंडरवर अनुदान मिळणार आहे.

आज दिनांक 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. या दिवसाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने सर्वसामान्य महिलांना दिलासा मिळाला आहे. मोदी सरकारने एलपीजी सिलेंडर वरील अनुदान एक वर्षासाठी आणखीन वाढवले आहे. पीएम उज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना 31 मार्च 2025 पर्यंत एलपीजी सिलेंडरचे अनुदान मिळणार आहे. यामुळे 12000 कोटीचा बोजा सरकारवर पडणार आहे. भारतातील प्रत्येक कनेक्शन वर वर्षभरात 12 अनुदानित सिलेंडर दिले जाणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची तारीख जाहीर होण्याअगोदरच मोदी सरकारने एलपीजी सिलेंडर वरील अनुदानाची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पीएम उज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना 31 मार्च 2025 पर्यंत एलपीजी सिलेंडर वरील अनुदान मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुदानाची मुदत एक वर्षासाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर 300 रुपये अनुदान मिळणार

पीएम उज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर 300 रुपये अनुदान योजना 31 मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही सबसिडी दिल्याने सरकारवर 12000 कोटी रुपयांचा बोजा पडणार असल्याची माहिती वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. पीएम उज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी बारा सिलेंडर वर सबसिडी दिली जाईल, अशी माहिती त्यांनी सांगितली. LPG Cylinder Price

या दरम्यान मोदी सरकारने 29 ऑक्टोबर 2023 रोजी सर्वसामान्यना दिलासा देण्यासाठी एलपीजी सिलेंडर वर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याचा कालावधी 31 मार्च 2024 पर्यंत होता मात्र लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार असून त्यानंतर देशात आचारसंहिता लागू होणार आहे. अशा परिस्थितीत या योजनेचा कालावधी वाढवणे सरकारला अवघड झाले आहे. अशा स्थितीत मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटच्या कॅबिनेट बैठकीत सिलेंडरवर अनुदान देण्याचा निर्णय 31 मार्च 2015 रोजी पर्यंत वाढवण्यात आला आहे.

किती रुपयाला मिळतोय सिलेंडर?

एलपीजी सिलेंडर घेण्यासाठी सर्वसामान्य ग्राहकांना 903 रुपये द्यावे लागतात. 1100 रुपयाचा घरगुती एलपीजी सिलेंडर 903 रुपयाला उपलब्ध आहे. तर सरकार प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण तीनशे रुपये अनुदान देत आहे. म्हणजे पीएम उज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजी सिलेंडर फक्त 603 रुपयाला मिळत आहे.

दरम्यान मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०२३२४ ते २०२५२६ या तीन वर्षात 75 लाख एलपीजी कनेक्शन जरी करण्याच्या योजनेच्या विस्तारास मान्यता देण्यात आली आहे. 75 लाख अतिरिक्त उज्वल कनेक्शनच्या तरतुदीमुळे प्रधानमंत्री उज्वल योजनेच्या लाभार्थ्यांची एकूण संख्या 10.35 कोटी झाली आहे.

हे पण वाचा:- आज सोन्याच्या दरात झाली वाढ..! पहा आजचा 10 ग्राम सोन्याचा भाव

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “सर्वसामान्य नागरिकांना मोदी सरकारची भेट..! या तारखेला मिळणार LPG सिलेंडरचे अनुदान, सरकारवर 12000 कोटीचा बोजा”

Leave a Comment