Loan Waiver Of Farmers | शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून बराच वेळा संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाते. अशातच झारखंड येथील राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. या सरकारची लवकरच कर्जमाफीची घोषणा होणार आहे. दिल्ली येथे शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी व शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.
अशातच आता झारखंड सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. त्यानुसार लवकरच राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपये पर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा सरकारकडून केली जाणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.
इतक्या रुपयांची निधी गरज भासणार लागणार
यावर्षी झारखंड मधील विधानसभा निवडणूक होणार आहे त्यापूर्वी झारखंड येथील सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे तसेच लोकसभा निवडणूक देखील होणार आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी चंपई सोरेन सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफीची योजना राबवली असे सांगण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची जवळपास दोन लाख रुपये पर्यंतचे कर्ज माफ करण्यासाठी येणार आहे त्यासाठी सरकारला 500 कोटीची निधीची गरज भासणार आहे. आता या निधी बाबत येत्या अर्थसंकल्पनामध्ये तरतूद करण्यात येणार आहे.
जशी महाराष्ट्र मध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच चाकण मध्ये देखील परिस्थिती निर्माण झाली आणि कर्नाटक मध्ये सुद्धा दुष्काळ स्थिती घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळणे वापरणाऱ्या बळीराजाला कर्जमाफीतून ती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. व यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे
महाराष्ट्रात कधी होणार कर्जमाफी
महाराष्ट्र देखील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागणार आहेत व त्या झाल्यानंतर विधानसभा निवडणुका लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या समस्या समजून जून कर्जमाफी करणार का याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.
राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे. मागच्या काही दिवसापूर्वी केंद्राच्या पथकाने दुष्काळ पाहणी करून जवळपास दोन महिन्याचा काळ उलटून गेला आहे. अजून देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही.
याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. इतकेच नाही तर राज्य सरकारकडून देखील सुद्धा कोणतीही मोठे पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे राज्य सरकार शेतकऱ्यांबाबत कोणतेही सकारात्मक पाऊल उचलताना दिसत नाही.
1 thought on “Loan Waiver Of Farmers |शेतकऱ्यांची दोन लाख रुपयापर्यंत कर्ज होणार माफ; या राज्य सरकारची योजना सुरू”