Loan Waiver | आतापर्यंत जिल्ह्यातील १लाख ७७ हजार ३५९ शेतकऱ्यांना 624 कोटी 69 लाख रुपये लाभ देण्यात आलेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना संकटाच्या वेळी धीर देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले योजना राबवली जात आहे.
या योजनेअंतर्गत शेशेतकऱ्यां प्रोत्साहन पर अनुदान व कर्ज माफी दिली जाते. राज्य शासनाने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2019 मध्ये पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिले होते.
परंतु जिल्ह्यातील अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहे. लोकप्रतिनिधीने अर्थसंकल्प मी अधिवेशनात विषय मांडल्यानंतर शासनाने परिपत्रक जाहीर केल्यानंतर यामध्ये एक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्याच्या आधीच दिली आहेत.
तीन वर्षांमध्ये फक्त एकदाच पीक कर्ज उचल केलेल्या 36 हजार शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभासाठी 2017-18/2018-19/19-2019/20 या कालावधीचा विचार घेतला जाणार आहे.
कर्जाच्या मुद्देवर जास्तीत जास्त पन्नास हजारांपेक्षा कमी असल्यास त्यांना 2018-19 व 2019-20 या वर्षातील कर्जाची मुलाच्या रकमेत हा लाभ दिला जाईल. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख 77 हजार 359 शेतकऱ्यांना 644 कोटी 69 लाख रुपये अनुदान देण्यात आलेले आहे.
उर्वरित ८० हजार शेतकरी खातेदार अपुत्र असल्याची शक्यता होती. परंतु पावसाळी अधिवेशनामध्ये 11000 पात्र लाभार्थ्यांचा विषय झाला उर्वरित एक लाख शेतकरी खातेदारांना लाभ मिळणार का असा प्रश्न होता. यासाठी अधिवेशनामध्ये आमदार पी एन पाटील यांनी विषय मांडला आहे.
व त्यानंतर शासनाने परिपत्रक द्वारे वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेतलेला शेतकऱ्यांच्या याद्या दोन दिवसात तपासून तयार ठेवाव्यात व यासाठी सलग तीन दिवस सुट्ट्या असताना सचिवांच्या सुट्ट्या रद्द करून काम करावे असे आदेश दिलेले आहेत .
डी डी आर कार्यालयाकडून आदेश येतात पोर्टल सुरू होताच पोर्टलवर यादी अपलोड करण्यात येणार आहेत. तीन वर्षात दोनदा पिक कर्ज घेतलेले असे 14000 शेतकरी खातेदारांना लाभ मिळणार आहे.