Ladki Bhaeen Yojana December installment : राज्यातील महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ₹1500 रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे महिलांमध्ये आता आनंदाची लाट पसरलेली आहेत. अनेक महिलांच्या खात्यावरती आता ₹1500 रुपये जमा झालेले आहे. परंतु काही अशा महिला आहेत त्यांच्या खात्यावरती अद्याप एकी रुपया जमा झालेला नाही त्याचे सविस्तर कारण आपण जाणून घेऊया. Ladki Bhaeen Yojana December installment
महाराष्ट्र शासन अंतर्गत मागील काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांच्या खात्यावरती पाच हप्ते जमा करण्यात आलेला आहे. आता यापुढे सव्वा हप्ता देखील काही महिलांच्या खात्यावरती जमा झालेला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेची सुरुवात झाली होती नवीन सरकार मध्ये ही योजना सुरू राहिली आहे. तर देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने आपले आश्वासन पूर्ण केलेले आहे.
महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात
राज्य सरकारांतर्गत राबविण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना मासिक हपत्याचे वितरण पुन्हा सुरू झालेले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे वितरण थांबवण्यात आलेले होते. आता ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आलेली असून टप्प्याटप्प्याने महिलांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार आहेत.
महिलांना किती मिळतो लाभ
महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमध्ये महिलांना आर्थिक लाभ मिळत आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांना प्रत्येकी ₹1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना राबविण्यात आली या योजनेचे मोठे लाभार्थी महाराष्ट्रामध्ये आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 2.34 कोटी लाभार्थी आहेत.
राहिलेल्या महिलांच्या खात्यावरती कधी होणार पैसे जमा
राज्य सरकार अंतर्गत अद्याप काही महिलांच्याच खात्यावरती पैसे जमा करण्यात आलेले आहेत. परंतु अद्याप अनेक महिला आहेत त्यांच्या खात्यावरती एक रुपयाही जमा झालेला नाही. मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, टप्प्याटप्प्याने हळूहळू महिलांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे कुठलेही टेन्शन घेण्याचे कारण ज्या महिलांच्या आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे अशाच महिलांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे.
महिलांमध्ये आत्मविश्वास वाढणार!
महिलांच्या खात्यावरती या योजनेचा आता 6 वा हप्ता देखील जमा झालेला आहे. आणि नवीन सरकारमध्ये देखील ही योजना सुरू राहिल्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढणार आहे. मंत्री आदित्य तटकरे यांनी एक पोस्ट शेअर करत आर्थिक मदतीमुळे आत्मविश्वास वाढेल आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे.