Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सर्वत्र चर्चा होत आहे. सध्या या योजनेतील निकषाचे काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेसाठी अनेक अपात्र महिलांनी अर्ज करून लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकारने या योजनेची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता निवडणुकीनंतर तब्बल पाच लाख महिला या योजनेतून अपात्र झाल्या आहेत. त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यातील हप्ता देण्यापूर्वी आणखीन महिला या योजनेतून अपात्र होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा | या लाडक्या बहिणींना आता लाभ मिळणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्त्वाची माहिती
काही दिवसांपूर्वी सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन चार चाकी वाहन आहे का नाही याची तपासणी केली आहे. या योजनेअंतर्गत स्थानिक पातळीवर सरकारने छाननी सुरू केली आहे. सरकारची छाननी सुरू झाल्यानंतर राज्यातील दीड लाख महिलांनी स्वतःहून आम्हाला लाडके बहिण योजनेचा लाभ नको यासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे तब्बल दहा लाख महिला या योजनेसाठी अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चार चाकी वाहनाच्या निकषाचे कठोरपणे पडताळणी केली जाणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेचे खरे लाभार्थी शोधण्यासाठी आणखीन एका गोष्टीची मदत घेतली जात आहे. राज्य सरकारने लाभार्थी महिलांच्या आयकर विभागाची माहिती विभागाकडून मागवली आहे. ही माहिती आल्यानंतर मुंबई कोकण उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा या भागात अपात्र लाडक्या बहिणींची खरी लाभार्थी संख्या तुमच्यासमोर येणार आहे. Ladki Bahin Yojana
हे पण वाचा | सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ..! पहा आजचे 14 ते 24 कॅरेट सोन्याचा दर
लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी अर्ज केले होते त्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता. मात्र निवडणुका संपल्यानंतर राज्य सरकारने पात्र महिलांची पाडताळणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर महिला विकास विभागाने पाच लाख लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात ही योजना सुरू करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीत लाडके बहिण योजना सर्वात मोठी गेम चेंजर ठरली आहे.
दरम्यान या योजनेचा पुढील हप्ता लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे. फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा असल्यामुळे या महिन्याचे पैसे 20 फेब्रुवारी च आसपास लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ शकतात. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेले नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनी पुढील हप्ता यांच्या खात्यात कधी जमा होतो याची वाट पहावी.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा