Ladki Bahin Yojana Update: राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सर्वत्र सुप्रसिद्ध ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. मात्र आता या योजनेच्या संदर्भात अनेक नवनवीन बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये दिसत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसता ही अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. आता सरकार त्या महिलांकडून पैशाची वसुली करणार अशा चर्चा अनेक दिवसापासून होत आहेत. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
हे पण वाचा | या लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र; आता यापुढे या महिलांना 1 रुपयाही मिळणार नाही?
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले की, लाडकी बहीण योजनेतील कोणत्याही निकषात बदल केले नाहीत किंवा नवीन निकष आणले नाहीत. आम्ही स्वतःहून कोणत्याही महिलांकडून पैसे परत घेतले नाहीत. हे पैसे परत मागण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. पण नियमाच्या बाहेर जाऊन कोणी या योजनेचा फायदा घेत असेल तर त्यांना लाभ मिळण्याचा बंद होणार आहे. आम्ही जनतेच्या पैशाचे रक्षक आहोत. त्यामुळे जनतेचा पैसा योग्य ठिकाणीच पोहोचला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतो. असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
हे पण वाचा | हैरान करणारी आकडेवारी; लाडकी बहीण योजनेतून एवढ्या महिला अपात्र? पहा सविस्तर..
लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांना इथून पुढे या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. काही लाडक्या बहिणींनी निकशाच्य बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतला आहे. जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी स्वतःहून या योजनेचा लाभ बंद करण्यासाठी अर्ज देखील केले आहेत. अशा प्रामाणिक महिलांचे आम्ही आभार मानतो असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. लाडकी बहीण योजनेच्या नियमात ज्या महिला बसत नाहीत फक्त अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे. Ladki Bahin Yojana Update
हे पण वाचा | लडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांनी दिली मोठी अपडेट! या महिलांचे टेन्शन वाढणार?
राज्य सरकारच्या छाननीच्या नियमानुसार आतापर्यंत पाच लाख महिला या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत. त्यामध्ये दोन लाख तीस हजार महिला या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत. त्याचबरोबर एक लाख दहा हजार महिला 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेले आहेत. तर महिलांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी गाडी, नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी अशा महिला स्वइच्छेने नाव मागे घेणाऱ्या एकूण एक लाख 60 हजार आहेत. याप्रकारे एकूण पाच लाख महिला या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेले आहेत.