Ladki Bahin Yojana Scheme: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सर्वत्र सुप्रसिद्ध ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. राज्यातील महिला स्वावलंबी बनवण्यासाठी महायुती सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून जानेवारी महिन्यापर्यंत एकूण सात हप्त्याचे लाभार्थी महिलांच्या खात्यात दहा हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत. यानंतर महिलांना फेब्रुवारी महिन्याचे प्रतीक्षा लागली आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींचे आयकर रेकॉर्ड तपासणार; लाखो महिला होणार अपात्र..
फेब्रुवारी महिन्यांचा हप्ता कधी मिळणार?
राज्यातील लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे. दरम्यान सूत्रांकडून याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 25 फेब्रुवारीला महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील तीन महिन्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना देण्यात येत आहे. त्यामुळे यावेळीही फेब्रुवारी चा हप्ता शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे. फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा असल्यामुळे 25 तारखेला हा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. या महिन्यात देखील शेवटच्या आठवड्यात म्हणजे 25 फेब्रुवारी च्या आसपास वितरित होऊ शकतो.
हे पण वाचा | सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ..! पहा आजचे 14 ते 24 कॅरेट सोन्याचा दर
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार?
विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचार सभेत महायुती सरकारने या योजनेच्या रकमेत वाढ करून 2100 रुपये करू असे आश्वासन दिले होते. मात्र अजून लाभार्थी महिलांना 2100 रुपये मिळाले नाहीत. वाढीव रकमेचा हप्ता महिलांना कधी मिळणार याबाबत उत्सुकता लागली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2100 रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी महिलांना आणखीन काही महिने वाट पाहावी लागणार आहे. कारण अर्थसंकल्पानंतर या योजनेच्या रकमेत वाढ करू असे सांगण्यात आले आहे. राज्याचा अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर होणार असून, मार्च महिन्यापासून लाभार्थी महिलांना 2100 रुपये दिले जाणार आहेत.
हे पण वाचा | या लाडक्या बहिणींना आता लाभ मिळणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्त्वाची माहिती
अर्जाची छाननी सुरू..!
लाडकी बहीण योजनेचा अनेक लाभार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असल्याचे समोर आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने या योजनेची छाननी करण्याचा निर्णय घेतला. छाननी दरम्यान या योजनेतून जवळपास पाच लाख महिला अपात्र झाल्या आहेत. यामुळे आता या महिलांना पुढील काळात या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. त्याचबरोबर छाननी अजून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात देखील अनेक महिला या योजनेतून बाद होऊ शकतात. Ladki Bahin Yojana Scheme
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा