Ladki Bahin Yojana News: महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी जबरदस्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश राज्यातील गोरगरीब महिलांना आर्थिक मदत देणे आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या योजनेच्या हप्त्याच्या रकमेत वाढ करण्याचे आश्वासन महायुती सरकारच्या बड्या नेत्यांनी दिले होते. लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
अजित पवार यांनी म्हटले आहे की, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होणार आहे. जालन्या मधील एका कार्यक्रमात त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. या ठिकाणी येण्याआधी मी तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या चेकवर सही करून आलो आहे असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी या योजनेचा लाभ घेतला नाही पाहिजे. ही योजना गोरगरीब महिलांसाठी आहे त्यामुळे त्यांनीच या योजनेचा लाभ घ्यावा असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
हे पण वाचा | या लाडक्या बहिणींचे खटाखट पैसे येणे बंद होणार! लाडकी बहीण योजनेसाठी नवीन नियम लागू..
ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी या योजनेचा लाभ घेणे बरोबर नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. सरकारने महिलांच्या विकासासाठी एक चांगली योजना आणली आहे जी त्या घटकांसाठी आणखीन चांगले बनवू शकते. राज्यातील गोरगरीब महिलांना याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी स्वतःहून या योजनेचा फायदा घेणे चुकीचे आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. Ladki Bahin Yojana News
शेत कम करणाऱ्या महिला दोन्ही भांडी करणाऱ्या महिला स्वयंपाक करणाऱ्या महिला गोरगरीब महिलांसाठी ही योजना आहे. ज्या महिलांचे उत्पन्न हे 20 हजार रुपये आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र आहेत. ज्या महिलांना इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही त्यांच्यासाठी ही योजना आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना दोन अपत्य असावी अशी चर्चा सुरू होती. मात्र नंतर असं लक्षात आलं की ज्याचा पगार 40 हजार रुपये आहे घरी चार चाकी वाहन आहे अशा महिला देखील या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र आता हे पैसे परत घेतले जाणार नाहीत. भाऊबीज राखी पौर्णिमेला भेट दिलेली वस्तू परत घेणे ही आपली संस्कृती नाही. काही महिलांनी स्वतःहून आपले नाव मागे घेतले आहेत. उर्वरित अपात्र महिला देखील लवकरच समोर येतील असे अजित पवार यांनी म्हटले आहे.