Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यात सुप्रसिद्ध ठरलेली लाडकी बहिण योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार असल्याच्या चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. मात्र लाडकी वहिनी योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. जुलै 2024 मध्ये महाराष्ट्र सरकारने लाडके बहिण योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. विधानसभा निवडणुकीदरम्यान पात्र महिलांना 2100 रुपये दिले जाणार असल्याचे आश्वासन माहिती सरकारने दिले होते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांच्या खात्यात सात हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत. मात्र या योजनेतील निकष बदलणार असल्याची चर्चा होत आहे. पण आदिती तटकरे यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांना दिला जातो. तसेच ज्या महिला इतर कोणत्याही सरकारी योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळवत असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही. जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला फक्त दोन्हीपैकी एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे. अशा अनेक निकषाचे पालन केल्यानंतर त्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरविण्यात येत आहेत. Ladki Bahin Yojana
लाडकी बहिणी योजनेच्या अटी
- सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
- महिलेचे वय 21 ते 65 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
- या योजनेत लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबातील सदस्याचे वार्षिक इन्कम 2.5 लाखापेक्षा कमी असावे.
- लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य इन्कम टॅक्स भरणारा नसावा.
- जर महिला सरकारी नोकरी करत असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- ज्या महिलांच्या कुटुंबात कोणाकडेही चर्चा किंवा नसेल तर त्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- लाडकी बहीण योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त दोनच महिलांना दिला जातो.
अर्जाची पडताळणी सुरू…
लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार असून. ज्या भागातील महिला संशयित असतील त्या महिलांची पडताळणी सुरू आहे. दरम्यान यामध्ये अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जाणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. या योजनेत आपर्यंत अनेक महिलांना स्वतःहून अर्ज माघारी घेतले आहेत. अनेक महिलांनी स्वतःहून आपण या योजनेसाठी पात्र नसल्याचे सांगत आपला अर्ज माघ घेण्यासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे त्या महिला अपात्र ठरवण्यात आले आहेत. त्याचबरोबर सरकारने अपात्र महिलांना आवाहन केले आहे की ज्या महिला अपात्र आहेत त्यांनी स्वतःहून या योजनेतून माघार घ्यावी.