Ladki Bahin Yojana: विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने सुरू केलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची सर्वत्र सध्या चर्चा होत आहे. दरम्यान या योजनेतील लाभार्थ्यांची आता निकषानुसार पडताळणी होत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये चार चाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू आहे. पुढील टप्प्यात या योजनेच्या प्रत्येक निकषानुसार किती महिला पात्र आहेत आणि किती अपात्र आहेत हे ठरवले जाणार आहे. या योजनेअंतर्गत ची पुढील पडताळणी अंगणवाडी सेविका मार्फत करण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजनेतील तब्बल पाच लाख लाभार्थी अपात्र झाले आहेत. यामध्ये 65 वयावरील, संजय गांधी निराधार व नमो शेतकरी सन्माननीय योजनेच्या लाभार्थी महिला आहेत. राज्यातील चार कोटी पंचवीस लाख महिलांपैकी अडीच कोटी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे. मात्र या योजनेसाठी आलेल्या अर्जाची संख्या दोन कोटी 46 लाखापेक्षा जास्त आहे. याशिवाय एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे का नाही याची देखील पडताळणी होणार आहे. विधानसभेपूर्वी जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांच्या कागदपत्राची काटेकोरपणे पडताळणी होऊ शकली नाही.
फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? लाडक्या बहिणींसाठी आली मोठी अपडेट समोर..
त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि सरकारच्या तिजोरीवर दरमहा मोठा दबावाला. त्यासाठी सरकारला कर्जाची मदत देखील घ्यावी लागली. विविध योजनेसाठी मागील साडेसात महिन्यात सरकारने तब्बल एक लाख कोटीचे कर्ज काढल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर आता लाडकी बहिणी योजनेच्या प्रत्येक निकषानुसार लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार अपात्र ठरलेल्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाही. असे सांगण्यात येत होते मात्र ही रक्कम जमा करून घेण्यासाठी स्वतंत्र लेख शीर्ष तयार करण्यात आला आहे त्याद्वारे थेट पैसे खात्यात जमा केले जातील किंवा जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयात ही रक्कम कमी जमा करू शकता. सध्या चर्चा किंवा अंधारक महिलांची पडताळणी सुरू असून पुढील टप्प्यात पडताळणीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर त्या संदर्भात कारवाई देखील केली जाईल.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींचे आयकर रेकॉर्ड तपासणार; लाखो महिला होणार अपात्र..
अशा पद्धतीने होणार पडताळणी
- एका कुटुंबातील दोन पेक्षा अधिक लाभार्थी आहेत का नाही.
- बनावट कागदपत्राद्वारे योजनेचा लाभ घेतला आहे का नाही.
- कुटुंबातील व्यक्तीला निवृत्तीवेतन मिळत आहे का नाही.
- अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे का नाही.
- पाच एकर पेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी या योजनेतून अपात्र होणार आहेत.
हे पण वाचा | या लाडक्या बहिणींना आता लाभ मिळणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्त्वाची माहिती
केंद्र सरकारची शेतकरी सन्मान निधी योजनेप्रमाणेच राज्य सरकारची नमो शेतकरी योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला 12000 रुपये दिले जातात. राज्यात दोन्ही योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या 95 लाख 50 हजार एवढी असून यात 19 लाख महिला शेतकरी आहेत. त्या लाडक्या शेतकरी महिलांना या दोन्ही योजनेमधून दरमहा 1500 रुपये मिळतात. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील महिलांचा दरमहा १५०० रुपयाचा लाभ कमी करून आता त्यांना दरमहा केवळ पाचशे रुपये दिले जाणार असल्याचे सूत्रांकडून कळाले आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा