सर्वात मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय, तुमच्यासाठी जाणून घेणे महत्त्वाचे..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे राज्यात नीट अंमलबजावणी करण्यासाठी शिंदे सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. राज्य सरकारने आता लाडके बहिण योजनेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी संपूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यभरात दीड लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलेला प्रति महिना 1500 रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी राज्यातील लाखो महिलेने अर्ज केले आहेत. मात्र काही ठिकाणी महिलांना अर्ज करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. या योजनेची नीट अंमलबजावणी व्हावी यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.

सरकार आता लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावनीचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. राज्य सरकारने लाडके बहिण योजना राबवण्यासाठी दोन समित्या स्थापन केल्या आहेत. ही योजना यशस्वीरित्या राबवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. सरकारकडून दोन समित्या स्थापन गठीत करण्यात आले आहेत या समित्या आता अंमलबजावणी यशस्वीरित्या पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत.

कोणत्या जिल्ह्यातून किती अर्ज झाले आहेत?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी भंडारा जिल्ह्यातून आतापर्यंत 83 हजार 468 ऑफलाइन आणि ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. भंडारी जिल्ह्यात विविध ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ग्रामीण आणि शहरी भागात अर्ज भरण्यासाठी स्वातंत्र्य केंद्र स्थापन केले गेले आहे. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आणि आवश्यक मार्गदर्शन देण्यात येत आहे. Ladki Bahin Yojana

चंद्रपूर जिल्ह्यात 39 हजार 370 लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये पक्के झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात ऑफलाईन आणि ऑनलाईन मिळून 39 हजार 370 अर्ज प्राप्त झाले आहेत. नागपूर जिल्ह्यात 48 हजार 890 अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात 16 हजार महिला या योजनेपासून वंचित राहिले आहेत. पालघर जिल्ह्यात या योजनेची नोंदणी लाखाच्या पार गेली असल्याची माहिती समोर येत आहे. पालघर जिल्ह्यात ऑफलाईन आणि ऑनलाईन एक लाख 11 हजार 780 महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

पात्र महिलेचे अर्ज भरून घेण्यात येत आहेत. त्यानंतर जुलै महिन्यात महिलांच्या बँक खात्यावर दरमहा दीड हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी किंवा सेतू केंद्र तसेच तहसील कार्यालयात येणाऱ्या महिलांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

परळी मध्ये लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म भरण्यासाठी कॅम्प लावण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी विशेष कॅम्प आयोजन करण्यात आले आहे. या योजनेत जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत लाभ मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे.

या योजनेमुळे या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात वाढ!

नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांचे कामकाज या योजनेमुळे वाढले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सहा वर्षाच्या खालील बालकांना पोषक आहार वाटप, शिक्षणाचे धडे देण्याबरोबरच, गरोदर महिलेचे लसीकरण, त्यांना पोषक आहार देणे, गावात आरोग्य विषयी सभीर असल्यास मदत करणे, अधिक कामाचा बोजा अंगणवाडी कर्मचाऱ्यावर असतानाच शासनाने मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे अर्ज करण्याची जबाबदारी देखील त्या सेविकांवर सोपवली आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांचे कामकाज वाढले आहे.

अंगणवाडी सेविकेला दहा हजार पाचशे रुपये प्रति महिना असतो. एवढ्या मानधनात घर खर्च भागवणे कठीण आहे त्यामुळे लाडके बहिण योजनेसाठी पन्नास रुपये प्रति व्यक्ती देणार असल्याची घोषणा केली गेली आहे. मात्र पन्नास रुपये कमी असून मानधन वाढवावे अशी मागणी अंगणवाडी सेविका द्वारे करण्यात येत आहे.

अनेक भागात अर्ज भरण्यास अडचणी

छत्रपती संभाजी नगर मध्ये लाडके बहिण योजनेचा फॉर्म भरताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. शहरात लाडके बहिण योजनेसाठी अर्ज भरताना सर्वर डाऊन तर स्लोगतीने सुरू आहे. सर्वर डाऊन झाल्याने अर्ज भरण्यास लाडक्या बहिणी वैतागत आहेत. लाडक्या बहिणीसाठी अर्ज करण्यासाठी बराच वेळ रांगेत उभे राहावे लागत आहे. अशा अनेक अडचणी महिलांसमोर निर्माण होत आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा