Ladki Bahin Yojana: नमस्कार, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहिणी योजना सध्या ट्रेन करत आहे. या ट्रेनला घरून एका लाडक्या बहिणीने मुख्यमंत्री साहेबांना एक अनोखे पत्र लिहिले आहे. पत्र वाचल्यानंतर त्या पत्रावर विचार करायला हवा असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण होत आहे. Ladki Bahin Yojana
लाडक्या बहिणी योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
आदरणीय एकनाथ (दादा) शिंदे
मुख्यमंत्री -महाराष्ट्र राज्य
पत्र लिहण्यास कारण की, तूम्ही सुरू केलेली लाडकी बहीण माझी या योजने अंतर्गत आम्हाला तूम्ही महिना 1500/- रुपये देणार आहेसा. पण दादा हे पैसे आम्हाला नको. याबद्दल्यात तूम्ही गॅस चे दर कमी करा, महत्वाचे म्हणजे गगणाला भिडणारे विजेचे दर कमी करा, चांगले रस्ते तयार करा, ट्रॅफिकची समस्या सोडण्याचा प्रयत्न करा जेणे करून तुझ्या भावोजिंना पैशाची चणचण लागणार नाही. त्यांच्या कमी पगारात, कमाईत पण तुमची बहीण सुखी राहील.
दादा, आणखी एक विनंती करते.. तुमच्या लाडक्या भाचा-भाची ची शाळेची फी पण कमी करता येते का बघा जेणे करून त्याला चांगले उच्च शिक्षण सुद्धा घेता येईल.
दादा तुम्हाला एक कळकळीची विनंती तुम्हाला व आदरणीय प्रधानमंत्री साहेबांना हे फुकटाचे सगळे बंद करून महाराष्ट्रातील गुजरातला जाणारे प्रकल्प थांबवून आमच्या हाताला रोजगार निर्माण करून द्या व आम्हाला स्वावलंबी राहू द्या…
दादा.. आम्हाला 1500 रु खरंच नको देऊ. पण आमच्या संसारात ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या जरूर द्या…🙏🏻
तूझी लाडकी बहीण….
3 thoughts on “लाडक्या बहिणीने लिहिले मुख्यमंत्र्यांना अनोखे पत्र! सर्वाना विचार करण्यासारखे..”