Thursday

13-03-2025 Vol 19

लडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांनी दिली मोठी अपडेट! या महिलांचे टेन्शन वाढणार?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Scheme: राज्य सरकारने ज्या महिलांच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे. ज्या महिलांची आर्थिक स्थिती कुंकवत आहे. अशा महिलांसाठी मागील वर्षी लाडकी बहिणी योजना सुरू करण्यात आली आहे. आता या योजनेबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी अपडेट दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसणार आहे. लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा केले जातात.

या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एकूण सात हप्त्याचे दहा हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील लवकरच महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने काही निकष व नियम तयार केले आहेत. मात्र या निकषात न बसणाऱ्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे आता सरकारकडून अशा महिलांच्या अर्जाची छाननी सुरू आहे.

हे पण वाचा | या भागातील 22 हजार लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र; छाननी वेगात सुरू..

छाननी दरम्यान ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत त्या महिलांचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे. बाकीच्या गोरगरीब लाभार्थी महिलांसाठी ही योजना अशीच सुरू राहणार आहे. मात्र तरीदेखील या योजनेबाबत आता उलट सुलट चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये सुरु झाल्या आहेत. यावर पुन्हा एकदा मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आदिती तटकरे यांनी काय म्हटले आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

यासंदर्भात माध्यमानशी बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजना गेल्या वर्षातील जुलै महिन्यापासून सुरू झाली आहे. जेव्हापासून ही योजना सुरू झाली आहे तेव्हापासून वेगवेगळ्या स्तरावर या योजनेचे क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे. मागील महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात देखील या योजनेत काही डुबलीकेट फॉर्म आढळे आहेत. जो लाभार्थी या योजनेच्या निकषात बसत नाही त्यांना या योजनेतून वगळण्यात आला आहे. Ladki Bahin Scheme

हे पण वाचा | लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 5 टक्क्यांनी घटली, आणखीन कमी होणार, नेमकं कारण काय?

अनेक महिला आहेत ज्यांनी या योजनेसाठी दोनदा अर्ज केला आहे. त्याचबरोबर अनेक लाभार्थी महिलांकडे चार चाकी गाडी असली तरी त्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे. दर महिन्याला या योजनेच्या निकषात बदल होत असतो. उदाहरणार्थ समजा दोन महिन्यापूर्वी एखाद्या लाभार्थी महिलांकडे गाडी नव्हती मात्र तिने आता घेतली आहे. त्यामुळे या योजनेचे क्रॉस व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. या योजनेचे जे काही निकष आहेत ते शासन निर्णयामध्ये उल्लेख केलेला आहे. त्यानुसार ही सर्व प्रक्रिया चालू आहे. दरम्यान आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता ज्या महिला निकषांमध्ये बसत नाहीत, त्या महिलांचा लाभ कायमचा बंद होणार आहे. ही त्या महिलांसाठी धक्का बसणारी बातमी आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Rushi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *