या 55000 लाडक्या बहिणींना मिळणार नाही आठवा हप्ता; तुम्हाला मिळणार का नाही? पहा येथे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Scheme: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वत्र चर्चेचा विषय बनलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. या योजनेच्या लाभार्थी महिलांची फेरतपासणी सुरू आहे. यादरम्यान काही नियमाचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. यामुळे हजारो महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आले आहेत. मराठवाड्यातील 21 लाख 97 हजार 211 अर्जापैकी 55 हजार 334 महिलांचे अर्ज या योजनेतून बाद करण्यात आले आहे. मराठवाड्यातील 55 हजार 334 महिला लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्यापासून वंचित राहणार आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील 54 हजार 598 अर्जांना आणखीन मान्यताच मिळाली नाही.

हे पण वाचा | कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ! आवक देखील वाढली; जाणून घ्या आजचे कांद्याचे दर

मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेतील महिला लाभार्थी शेतकरी सन्मान निधी योजनेच्या महिला लाभार्थी व इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला लाभार्थी सखोल तपासणी पूर्ण झाली असून या योजनेच्या सर्व लाभार्थी महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरविण्यात आल्या आहे. मराठवाडा विभागातून 23 लाख 7184 महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी 21 लाख 97 हजार 211 अर्ज पात्र ठरले आहेत. यापैकी 54 हजार 598 अर्ज अजून मंजूरच झाले नाहीत. त्यानंतर पडताळणी दरम्यान 55334 अर्ज या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहेत.

हे पण वाचा | आज सोन्याचे दर काय आहेत? जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट सोन्याचे दर…

या दोन गोष्टी असल्या तरच आठवा हप्ता मिळणार

आता नव्या नियमानुसार लाभार्थी महिलांकडे बँकेत दरवर्षी जून जुलै महिन्यात ई केवायसी सादर केलेली असावी. तसेच सर्व महिलांना हयातीचा दाखला देखील द्यावा लागणार आहे. यानंतरच लाडकी बहिणी योजनेचे पैसे बँक खात्यात जमा होणार आहेत असे महाराष्ट्र शासनाकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. Ladki Bahin Scheme

हे पण वाचा | लाडकी बहिणी योजनेतून या महिला होणार अपात्र..! अजित दादांनी दिली महत्त्वाची माहिती

जिल्ह्यानुसार अपात्र महिलांची आकडेवारी

छत्रपती संभाजीनगर मध्ये 6655 महिला या योजनेतून अपात्र झाल्या आहेत. धाराशिव मधून 2533 महिला या योजनेतून अपात्र झाले आहेत. लातूर मधून आठ हजार एक महिला या योजनेतून अपात्र झाल्या आहेत. जालन्या मधून नऊ हजार 622 महिला या योजनेतून अपात्र झाले आहे. हिंगोली मधून पाच हजार आठशे पंचवीस महिला या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत. परभणी मधून 2802 महिला या योजनेतून अपात्र ठरले आहेत. बीड मधून 9364 महिला या योजनेतून अपात्र झाले आहेत. नांदेड मधून दहा हजार पाचशे बत्तीस महिला योजनेतून पात्र झाले आहेत. एकूण 55334 महिला या योजनेतून अपात्र ठरवण्यात आल्या आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment