Kanda Chal Anudan Yojana 2023 | कांदा चाळ योजना सुरू


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kanda Chal Anudan Yojana 2023 : राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय दृष्ट्या कांदाचा उभारण्यामुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जावी म्हणून कांदा नुकसान होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी व शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे.

शेतकरी कांदा जमिनीवर पसरून ठेवतात किंवा पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या कांदा त्यामध्ये कांद्याची साठवणूक करून ठेवतात त्यामुळे कांदा सडतो व खराब होतो व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते तसेच कांद्याचे प्रत व टिकाऊपणा यावर विपरीत परिणाम होते. शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेसाठी कशाप्रकारे अर्ज करायचा आहे व कागदपत्रे पात्रता या सर्व गोष्टींची माहिती आपण पाहणार आहोत.

अर्ज कसा करावा : शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी हार्टनेट या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी

  • योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छित उमेदवारांसाठी हार्टनेट या ऑनलाईन संकेतस्थळावर रजिस्टर करणे आवश्यक आहे.
  • या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करताना आवश्यक कागदपत्रे अधिकृत संकेतस्थळावर काळजीपूर्वक अपलोड करावी.
  • तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी कृषी अधिकारी यांच्याकडे अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला सविस्तर प्रस्ताव सादर करावा लागेल.
  • शेतकऱ्यांनी शेतामध्ये कांदा चाळ उभरणी झाल्यानंतर तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांना लेखी स्वरूपात कळवावे.

या योजनेची नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा

Kanda Chal Anudan Yojana 2023 निवड प्रक्रिया :

  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे.
  • सातबारा वर कांदा पिकाची नोंदणी असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याकडे शेतामध्ये कांदा पीक असणे बंधनकारक आहे.
  • या योजनेचा लाभ व्यक्ती कांदा उत्पादक शेतकरी, शेतकरी महिला गट, शेतकऱ्यांचा गट, स्वयंसहाय्यता गट , शेतकऱ्यांचे उत्पादक संघ, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, यांना पण घेता येईल

Kanda Chal Anudan Yojana 2023 या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • सातबारा
  • आठ अ उतारा
  • आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्याचे पासबुक झेरॉक्स
  • जातीचे प्रमाणपत्र ( अनु. जाती / अनु. जमाती )
  • याआधी कोणत्याही योजनेतून कांदा चाळ योजनेचा लाभ न मिळालेले हमीपत्र

आम्ही कांदा चाळ योजना बाबत माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे जर तुम्हाला या योजनेबाबत काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून विचारू शकता.

हे पण वाचा –

अशाच योजनेविषयी माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवीन योजना विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायांचा वापर करा

2 thoughts on “Kanda Chal Anudan Yojana 2023 | कांदा चाळ योजना सुरू”

Leave a Comment

error: Content is protected !!