कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना 2023, असा करा ऑनलाईन अर्ज; 20 हजार रु. अनुदान मिळणार : Kadba Kutti Yojana 2023


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kadba Kutti Yojana 2023 : शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक अशा योजना राबविण्यात येत असतात. त्या योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे अवजारे व आर्थिक मदत मिळवण्यासाठी सरकार नवीन नवीन योजना शेतकऱ्यांसाठी आणत असते. तसेच हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनामार्फत कडबा कुट्टी मशीन योजना अनुदान ( Subsidy Scheme ) सुरू करण्यात आलेली आहे.

कडबा कुट्टी मशीन योजना 2023 ( MAHARASHTRA KADBA KUTTI ANUDAN )

सध्याच्या काळात सुद्धा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर म्हशी, गाई, शेळ्या, इतर पाळीव पशु प्राणी आहेत. शेतकरी शेती सोबत जोडधंदा म्हणून जमिनीसाठी दूध शेणखत होईल हा विचार करून जनावरांचा सांभाळ करत असतात.

हे पण वाचा | – शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ज्या शेतकऱ्यांकडे शेळी, म्हशी, गाय, अशी गोरे-ढोरे आहेत. त्यांना जनावराच्या चारापाणी व्यवस्थापन करावा लागतो जनावरांना चारापाणी करण्यासाठी खूप कष्ट घ्यावा लागतात. जर तुम्ही पण एक शेतकरी असाल तर तुमच्याकडे गोरे-ढोरे असतील तर त्यांना चारापाणी करण्यासाठी राज्य शासनाकडून कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना सुरू झाली आहे. तर या योजनेसाठी आपण कसा अर्ज करायचा व किती अनुदान मिळते हे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

कडबा कुट्टी मशीन अनुदान व किंमत

या योजनेचे संपूर्ण नावकडबा कुट्टी मशीन अनुदान योजना
लाभार्थीया योजनेसाठी शेतकरी लाभार्थी असणार आहे
लाभाचे स्वरूपवीस हजार रुपये पर्यंत अनुदान मिळेल
अर्जाची प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

जर तुम्हाला कडबा कुट्टी मशीन खरेदी करायची असेल तर मशीनची किंमत दहा हजारापासून ते 40 हजारापर्यंत आहे. तुमच्या जनावरांची क्षमता कडबा कापण्याची(3एचपी,5एचपी) गती यानुसार कडबा कुट्टी मशीन ची किंमत ठरवली जाते असते. कडबा कुट्टी मशीन मध्ये मानव चलीत व स्वयंचलित अशा दोन प्रकारचे यंत्राचा समावेश आहे. मानवचलित यंत्रे स्वस्त तर स्वयंचलित यंत्रांची किंमत जास्त असते.

कडबा कुट्टी मशीन साठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अशा महिला व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी 50% वीस हजार रुपयांच्या मर्याद्रीपर्यंत अनुदान मिळते तर इतर शेतकऱ्यांनाही अनुदान मर्यादित 16 हजार रुपये पर्यंत दिली जाते.

कडबा कुट्टी अनुदान योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड (Aadhaar Card)
  • बँक पासबुक झेरॉक्स ( Bank Passbook Xerox )
  • जातीचा दाखला
  • 8 अ उतारा
  • GST बिल, हमीपत्र, कोटेशन, करारनामा

अर्ज कसा करायचा :-

कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरावा लागतो. फॉर्म भरल्यानंतर शेतकऱ्याची लॉटरी पद्धतीने निवड केली जाते व निवड केल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड कराव्या लागतात व कृषी सहाय्यक व कृषी अधिकारी यांच्याकडून पडताळणी केली जाते पडताळणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना कळवा कुट्टी मशीन अनुदान दिले जातात.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!