IndW vs SLW Live Score : आज भारत vs श्रीलंका महिला वर्ल्ड कप चा पहिला सामना गुहाटी येथे सुरू झाला असून भारताची सुरुवात चांगली झालेली नाही. संघाच्या स्टार ओपन स्मृती मंधना फार काही करू शकले नाही आणि स्वस्तात माघारी परतली. चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याने मैदानात आणि टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांमध्ये निराशेचे वातावरण आहे. श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवातीलाच भारतीय संघाला धक्का देण्यात त्यांना यश आले. IndW vs SLW Live Score
आजपासून महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ ची सुरुवात झाली असून भारत आणि श्रीलंका हे दोन्ही देश या स्पर्धेचे संयुक्त यजमान आहेत. हरमीन प्रीत कौर च्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरला आहे. आतापर्यंत भारतीय महिला वर्ल्ड कप जेतेपद कधीच जिंकलेले नाही, दोनदा आणि अंतिम फेरी पर्यंत पोचूनही हातातून ट्रॉफी निसटली. त्यामुळे यंदाच्या चहत्यांच्या मनात मोठ्या अपेक्षा आहेत.
श्रीलंकेचा महिला वर्ल्डकप मध्ये हा परतीचा प्रवास आहे. तब्बल आठ वर्षांनी ते पुन्हा या मोठ्या स्पर्धेत उतरले आहेत. पण भारताचा श्रीलंकेवर वनडे सामन्यांमध्ये नेहमीच वरचष्मा राहिला आहे. आतापर्यंत खेळलेल्या गेलेल्या 35 सामन्यातून तब्बल 31 भारताने जिंकले आहेत, फक्त तीन सामने सिलेंडरच्या नावावर गेले, तर एक सामना अनिरतीत राहिला.
आज गुहाटीच्या बरसापरा स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळावी अशी अनेक चाहत्यांच्या अपेक्षा होत्या. पण मंदाना लवकर बाद झाल्याने संघ थोड्या दडपणाखाली आला आहे. सध्या भारताचा स्कोर 14 धावा एक गडी बाद असा आहे (3.2 षटकात). आता मधल्या फळीत फलंदाजांवर जबाबदारी येऊन ठेपली आहे की त्यांनी डाव सावरावा आणि भारताला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचावं.
हे पण वाचा | भारत विरुद्ध इंग्लंड महिला वर्ल्ड कप सराव येथे लाईव्ह पहा! England Women vs India Women Live