Thursday

20-03-2025 Vol 19

देशात तयार होणार नवीन 8 एक्सप्रेस वे; कसे आहेत रूट ? वाचा सविस्तर.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

India new Expressway : देशात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा विकसित करण्यावर शासनाचा मुख्य जोर राहिला आहे. प्रामुख्याने रस्ते विकासाच्या कामाला गेल्या काही वर्षात मोठी गती मिळाली आहे. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने रस्त्यांचे जाळे तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांमुळे देशभरात हजारो किलोमीटर लांबीचे नवीन मार्ग तयार झाले आहेत. अजूनही मोठमोठ्या मार्गांची कामे केली जात आहे.

काही मार्गांची कामे पूर्ण झाली आहेत. तर काही मार्गांची कामे सध्या स्थितीला सुरू आहेत. विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रातही अनेक महामार्गाची कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. यातील काही मार्गांचे काम सुरू झाले आहेत, तर काही मार्गांचे काम लवकरच सुरू होणार आहे. सध्या स्थितीला राज्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. हा मार्ग 700 किलोमीटर लांबीचा आहे. यापैकी 600 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. म्हणजे, सहाशे किलोमीटर लांबी च्या समृद्धी महामार्ग सामान्य जनतेसाठी सुरू देखील झाला आहे.

सद्यस्थितीला समृद्धी महामार्गाचा नागपूप ते भरवीर हा टप्पा पूर्ण झालेला आहे. भरवीर ते मुंबई हा टप्पा देखील लवकरच वापरण्यात सुरू होण्याची शक्यता आहे. याशिवाय नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग देखील तयार केला जाणार आहे. तसेच सुरत, चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग देखील महाराष्ट्रातून जाणार आहे. शिवाय इतरही महामार्गांचे काम आपल्या राज्यात जोरात सुरू आहे. दरम्यान आता आपण देशात सुरू होणाऱ्या नवीन आठ एक्सप्रेस वे बाबत थोडी माहिती पाहणार आहोत.

दिल्ली, मुंबई महामार्ग :

देशाचे राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई या दरम्यान 1350 किलोमीटर लांबीचा मार्ग पूर्ण केला जात आहे. सध्या या मार्गाचे काम सुरू होत, असून या मार्गाचा पहिला टप्पा नुकताच काही पंतप्रधानांच्या हस्ते सुरू करण्यात आलेला आहे. या मार्गाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते दिल्ली हा प्रवास मात्र 12 तासात पूर्ण करता येणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार या मार्गाचे फेब्रुवारी 2024 पर्यंत काम पूर्ण होणार आहे. म्हणजे पुढल्या वर्षी या महामार्गाचा लाभ सर्वसामान्यांना मिळणार आहे‌

गंगा एक्सप्रेस वे :

उत्तर प्रदेश राज्यात तयार होणारा हा महामार्ग मेरठ आणि प्रयागराज या दोन शहरांना जोडणारा आहे. हा मार्ग जवळपास 594 किलोमीटर लांबीचा राहील. यामुळे या दोन्ही शहरा दरम्यान चा प्रवासांचा वेळ 6 तासांवर येईल असा अंदाज आहे. हा महामार्ग प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पूर्वीच सुरू होणार, असा दावा काही मीडिया रिपोर्टर्स मध्ये केला जात आहे.

दिल्ली-अमृतसर-कटवा एक्सप्रेस वे :

दिल्ली, अमृतसर कटवा एक्सप्रेस वेजवळपास 650 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. या मार्गामुळे दिल्ली ते कटरा हा प्रवास वेगवान होणार असून, यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार अशी आशा व्यक्तं होत आहे. यामुळे दिल्ली, पंजाब आणि जम्मू-काश्मीर मधील धार्मिक ठिकाणे जोडले जाणार आहे.

अहमदाबाद, ढोलेरा एक्सप्रेस वे:

गुजरात येथे तयार होणारा ढोलेरा या स्मार्ट सिटीला अहमदाबाद सोबत कनेंक्ट करण्यासाठी हा महामार्ग विकसित केलां जाणार आहे. या महामार्गाची एकूण लांबी 109 किलोमीटर राहणार असून, हा मार्ग पुढल्या वर्षी पूर्ण होईल अशी शक्यता आहे. या मार्गामुळे सरदार पटेल रिंगरोड ते ढोलेरा आंतरराष्ट्रीय विमानतळ परस्परांना जोडल्या जाणार आहे. या मार्गासाठी जवळपास 3196 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यामध्ये भूसंपादनाचा खर्च पकडलेला नाही. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर गुजरात मधील एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे.

गोरखपूर — शामली एक्सप्रेस वे :

उत्तर प्रदेश राज्यातील एकात्मिक विकास सुनिश्चित करण्यासाठी या मार्गाची पायाभरणी करण्यात आली आहे. हा महामार्ग उत्तर प्रदेश मधील आतापर्यंतचा सर्वात लांबीचा तिसरा महामार्ग राहणार आहे.गोरखपुर ते शामली दरम्यान 700 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार केला जाणार आहे. यासाठी जवळपास 35 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या 700 किलोमीटर लांबीच्या महामार्गामुळे उत्तर प्रदेशातील रस्ते वाहतूक आणखीन सक्षम होणार आहे.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *