India Meteorological Department forecast : राज्यामध्ये 15 ते 20 तारखेपर्यंत तुफान पाऊस झाला त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने (IMD) राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेले आहे. राज्यामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झालेले आहे आणि आज 25 ऑगस्ट रोजी भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाज मध्ये राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. काही ठिकाणी तर मुंबईमध्ये मुसळधार पावसाच्या सरी पडायला सुरुवात झालेली आहे. रस्ते पाण्याखाली गेले लोकल उशिरा धावते आणि बस स्टॉप वरती गर्दी शाळेत जाणारे मुलं पावसात भिजलेत पालक घाईत आहेत. ग्रामीण भागामध्ये मागच्या आठवड्यात पावसाने शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. अशातच पुन्हा एकदा हवामान खात्याचा इशारा महत्त्वाचा ठरणार आहे.
हवामान खात्याचा नवीन अंदाज (New forecast from the Meteorological Department)
कोकण आणि मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग मध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. घाटमाथावरती पाऊस आणखी वाढेल असं सांगितलं जात आहे. बाकी काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. घाटमाथ्यावर पाऊस आणखी वाढेल असं सांगितलं जात आहे. तर काही ठिकाणी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे. आज राज्यांमध्ये लाडक्या बाप्पाचा आगमन झालेले आहे. या पार्श्वभूमी वरती पावसाने देखील हजेरी लावलेली आहे नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या भागात जोरदार पाऊस पडत आहे. India Meteorological Department forecast
तर मुंबईमध्ये नेहमीप्रमाणे पावसाने रेल्वे रस्त्यांवरती पाणी साचले आहे. काही ठिकाणी गाडी वाहतूक खोळंबली आहे. आठ दिवसांपूर्वी जशी परिस्थिती निर्माण झाली होती तशी नको असं सध्या नागरिकांचे म्हणणं आहे परंतु यात पार्श्वभूमीवर प्रशासन देखील तयारीला लागलेला आहे आणि काही ठिकाणी नियोजन सुरू झालेल आहे.
पावसाचा हा खेळ सुखदायी तर कधी संकट घेऊन येत असतो. शेतकरी डोळे लावून पावसाची वाट बघतात पण काही वेळा पाऊस शेतीचे नुकसान करून जातो. आता यापुढे भारतीय हवामान खात्याचा अंदाज किती खरा ठरतो याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.
हे पण वाचा | राज्यामध्ये या तारखेच्या दरम्यान; या जिल्ह्यामध्ये होणारा अवकाळी पाऊस, हवामान खात्याचा नवीन अंदाज