Greaves Cotton Share Price: भारतातील शेतकऱ्यांसाठी कापूस हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. याच पिकाला पांढरे सोने असे देखील टोपण नाव दिले गेले आहे. कारण ते शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देते. मात्र यंदा मान्सून उशिरा झाल्यामुळे व ऑगस्टमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही कापूस पीक विकलेले नाही. प्रतिकूल हवामानामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत कापूस उत्पादन तीस ते पस्तीस टक्के कमी झाले आहे.
सध्या नवीन कापसाचा सरासरी बाजार भाव 6500 ते 7000 रुपये प्रति क्विंटल एवढा आहे. राज्यात खाजगी बाजारपेठे मधून आतापर्यंत सुमारे 5.5 लाख कापसाच्या गाठीची खरेदी करण्यात आला आहे. साधारणपणे कापूस हा दिवाळीच्या आसपास बाजारात येतो. जानेवारी मध्ये अधिक कापूस बाजारात येईल तेव्हा संभाव्य भाव कमी होईल यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
चीन नंतर भारत हा सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे. जगातील सुमारे 25 टक्के कापूस उत्पादन भारत देश करतो. 2022 – 23 साठी गेल्या वर्षीच्या तुलनेत कापसाच्या आयातीत 55% आणि निर्यात 30 टक्के वाढ अपेक्षित होती. जागतिक स्तरावर 2023-24 मध्ये कापसाचे उत्पादन 0.5% ते 115 दशलक्ष गाठी किंचीत वाढण्याचा अंदाज आहे. अमेरिका या देशात उत्पन्न जास्त असले तरी चीन तुर्की आणि पाकिस्तान मध्ये उत्पन्न कमी झाले आहे.
Greaves Cotton Share Price
गेल्या चार-पाच दिवसात अकोला बाजारपेठेत कापसाच्या दरात थोडीशी घसरल झाली आहे. पुणे कृषी विभागाच्या बाजार माहिती आणि जोखीम व्यवस्थापन कक्षा नुसार जानेवारी – मार्च 2024 मध्ये दर सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल या श्रेणीत राहण्याचा अंदाज आहे.
त्यामुळे सरासरी येत्या काही महिन्यात कापसाचे भाव स्थिर राहण्याची शक्यता वर्तवली आहे. उशिरा मान्सूनमुळे उत्पन्नावर परिणाम झाला परंतु निर्यात बाजारातील स्थिर मागणीने जानेवारी 2024 मध्ये शेतकऱ्यांना कापसाच्या दरांना समर्थन दिले पाहिजे.
हे पण वाचा :-
- पिक विमा भरलेल्या या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 18 हजार 900 रुपये, पहा सविस्तर माहिती
- आता तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरून 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल, पहा सविस्तर माहिती
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कृपया शेअर करा.