Government Scheme for Women: भारत सरकार महिलांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवत आहे. ज्यांचा उद्देश सर्वसामान्य नागरिकांना मदत करणे हा आहे. नारीशक्ती ला चालल देण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. देशातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश्य असतात. आज आपण तुम्हाला सरकारच्या अशा योजनेबद्दल सांगणार आहोत ज्या फक्त महिलांसाठी चालवल्या जातात. आणि या योजनेद्वारे देशातील महिला लखपती होतात. चला तर मग जाणून घेऊया या सर्व योजनेबद्दल माहिती.
आपले केंद्र सरकार व राज्य सरकार देशातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक वेगवेगळे योजना राबवत आहे. अशातच महाराष्ट्र सरकारने महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत देण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देखील महिलांना दरमहा निधी दिला जातो. ज्यामधून महिला त्यांच्या दैनंदिन गरजा भागू शकतात. याशिवाय या मिळालेले पैशाची गुंतवणूक करून महिला चांगला परतावा देखील मिळू शकतात. पोस्ट ऑफिसच्या एखाद्या योजनेत दर महिन्याला 1500 गुंतवून महिला लखपती होऊ शकतात.
हे पण वाचा | फार्मर आयडी शेतकऱ्यांसाठी ठरणार मोठ्या फायद्याची; याद्वारे मिळणारी 5 महत्त्वाचे मोफत फायदे
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना:
देशातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकारने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू केली आहे. ही एक बचत योजना आहे, यामध्ये महिला गुंतवणूक करून चांगला नफा मिळू शकतात. या योजनेवर 7.5% व्याजदर दिला जातो. महिला या योजनेत जास्तीत जास्त दोन लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात. या योजनेत तुम्ही दोन वर्षासाठी गुंतवणूक करू शकता. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2025 आहे.
हे पण वाचा | महाडीबीटी अंतर्गत सौरचलित फवारणी पंप मिळण्यास सुरुवात; तुम्हाला मॅसेज आला का नाही?
एलआयसी विमा सखी योजना:
एलआयसी विमा सखी योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक दृष्ट्या स्ववलंबी बनवणे आहे. या योजनेअंतर्गत महिलांना एलआयसी एजंट बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर दरमहा सात हजार रुपये मानधन देखील दिले जाते. दहावी उत्तीर्ण महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. तीन वर्षाच्या प्रशिक्षणानंतर महिलांना एलआयसी एजंट म्हणून कामाची संधी मिळून दिले जाते. Government Scheme for Women
हे पण वाचा | आधार कार्डवर नवीन नियम लागू! सर्वांसाठी जाणून घेणे खूपच महत्त्वाचे..
लखपती दीदी योजना:
लखपती दीदी योजना देखील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून कर्ज काढून दिले जाते. या योजनेअंतर्गत महिला व्यवसाय करण्यासाठी पाच लाखापर्यंत कर्ज मिळू शकतात. हे कर्ज व्याजमुक्त आहे ज्यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय निर्माण करण्यासाठी खूप मदत होते. लखपती दीदी योजनेचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणे हा आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा