Gold Rate Today: या महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याचे दर घसरण्याचे नाव घेत नाहीत. मागील काही दिवसापासून सातत्याने सोन्याचे भाव केवळ वाढतच आहेत. यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलाच चटका बसला आहे. सोन्याने आठवड्याच्या पहिल्या दिवशी देखील त्याचा दरवाढीचा उपक्रम चालू ठेवला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याचे दर चांगलेच वाढले आहे. सोन्याचे वाढते दर पाहून सर्वसामान्यांमध्ये चिंता व्यक्त केले जात आहे.
गोल्ड रिटर्न्स च्या अधिकृत वेबसाईट नुसार, आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 390 रुपयाची वाढ झाली आहे. त्याचबरोबर आज 24 कॅरेट सोन्याचा नवीन दर 87210 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. सध्या आपल्या देशात लग्नसराई सुरू असल्यामुळे सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रत्येक जण सोन्याचे दागिने खरेदी करत आहे तर काहीजण सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करत आहेत. वाढत्या मागणीमुळे सोन्याचे दर देखील गगनाला भिडत आहेत. मागील काही दिवसापासून सोन्याच्या दरात होणारी वाट पाहून सर्वसामान्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
हे पण वाचा | या लाडक्या बहिणींना आता लाभ मिळणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्त्वाची माहिती
22 कॅरेट सोन्याचे दर
आज 22 कॅरेट सोन्याचा दर 795 रुपये प्रति ग्रॅम एवढा आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट सोन्याचा दर 63 हजार 960 रुपये प्रति आठ ग्रॅम एवढा आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट सोन्याचा दर 79 हजार 950 रुपये रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. तर 100 ग्रॅम सोन्याचा दर सात लाख 99 हजार 500 रुपये एवढा आहे. Gold Rate Today
हे पण वाचा | मागेल त्याला सोलार पंप योजनेचा कोटा पूर्ण झाला आहे का? पहा सविस्तर माहिती
24 कॅरेट सोन्याचा भाव
24 कॅरेट सोन्याचा एक ग्रॅम चा दर आठ हजार सातशे वीस रुपये एवढा आहे. 24 कॅरेट आठ ग्रॅम सोन्याचा दर 69 हजार 768 रुपये एवढा आहे. 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 87210 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. 24 कॅरेट 100 ग्रॅम सोन्याचा दर आठ लाख बहात्तर हजार शंभर रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे.
हे पण वाचा | तुरीच्या दरात वाढ होणार का नाही? सध्या किती मिळतोय दर? वाचा सविस्तर
शहरानुसार आजचे सोन्याचे दर
आज मुंबई पुणे जळगाव नागपूर सोलापूर छत्रपती संभाजी नगर कोल्हापूर या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 79800 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 87 हजार 60 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. आणि वसई विरार नाशिक भिवंडी या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 79830 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 87 हजार 90 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा