Friday

14-03-2025 Vol 19

बजेटनंतर सोने झाले खूपच स्वस्त; जाणून घ्या आजचा 10 ग्राम सोन्याचा भाव.. Gold Rate Today

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Rate Today: फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. दरम्यान अर्थसंकल्पानंतर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 3 फेब्रुवारी रोजी सोने स्वस्त झाले आहे. आज सोने शिखरावरून थोडे खाली घसरले आहे. मागील आठवड्यात बाजार बंद होण्यापूर्वी 24 कॅरेट सोन्याची किंमत 84 हजार 500 रुपये एवढी होती. त्यानंतर आज 24 कॅरेट सोन्याच्या भावात 150 रुपयाची घसरण झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 84 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटीत वाढ केली नाही. त्यामुळे सोन्याचे दर सध्या स्थिर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोन्याचे दर 85000 च्या दरम्यान जाण्यामागे काय कारण आहे?

सोन्याचे दर जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असतात, जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता आणि अमेरिकेच्या धोरणामधील होणारे बदल यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या गुंतवणुकीकडे पाहत आहेत. ज्यामुळे सोन्याची मागणी वाढत आहे. वाढत्या मागणीमुळे सोन्याच्या किमती देखील वाढत आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात व्याजदर कपात आणि अनिश्चितता कायम राहिल्यास सोने-चांदीचे किंमत आणखीन वाढू शकते. असा अंदाज सोने बाजार अभ्यासकाने वर्तवला आहे. याशिवाय भारतामध्ये लग्नसराई आणि सणासुदीचा काळ सुरू असल्यावर सोने-चांदीचे मागणी मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामुळे येत्या काही महिन्यात सोन्याची किंमत आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर

दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 150 रुपयांनी घसरून 84 हजार 630 रुपये प्रति दहा ग्राम एवढा झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 77,590 प्रति दहा ग्राम एवढा झाला आहे. मुंबई शहरामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 84 हजार 480 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 77 हजार 440 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. Gold Rate Today

चांदीचे दर किती आहेत?

आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. केंद्रीय बजेट सादर झाल्यानंतर चांदीच्या भावामध्ये दोनशे रुपयाची घसरण झाली आहे. चांदीची किंमत 99,400 प्रति किलो एवढी आहे. यापूर्वी चांदीची किंमत 99,600 रुपये प्रति किलो एवढी होती. चांदणे एक लाख रुपयाचा विक्रम पार केलेला आहे.

Disclaimer: आम्ही दिलेले सोने-चांदीचे दर इंटरनेट द्वारे माहिती घेऊन दिलेले आहेत. या दरामध्ये जीएसटी मेकिंग चार्जेस मिळवलेले नसतात. त्यामुळे आम्ही दिलेल्या दरामध्ये व स्थानिक ज्वेलरच्या दरामध्ये थोडाफार फरक आढळू शकतो. अचूक दर जाणून घेण्यासाठी व सोने चांदीच्या दराची खात्री करून घेण्यासाठी तुमच्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Rushi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *