Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात 24 तासात चांगली घसरण; नवीन दर तपासा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दरामध्ये सातत्याने चढउत्तर सुरू आहे. यामुळे नागरिकांमध्ये सोने खरेदी करण्याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. परंतु जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर २४ तासात सोन्याच्या दरात चांगली घसरण झालेली आहे. परंतु चांदीचे दर काही प्रमाणात वाढले असल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. परंतु सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. लग्नामध्ये वधूला मोठ्या प्रमाणात सोन्याची साखळी मंगळसूत्रसह इतरही दागिने भेट देणे अथवा स्वतःसाठी बनून घेतले जातात. Gold Price Today

त्यासाठी सराफ बाजारामध्ये सध्या ग्राहकांची गर्दी दिसत आहे. परंतु दरम्यान सोमवारी सोन्याच्या दरात वाढ झाल्याने चित्र वेगळे निर्माण झाले होते. 24 तासात सोन्याच्या दरात किंचित घट झाल्याने ग्राहकांमध्ये मात्र दिलासादायक परिस्थिती असल्याचे म्हटले जात आहे.

सोन्याचे दर Gold Rates

24 कॅरेट साठी प्रति दहा ग्रॅम 76 हजार 300 रुपये 22 कॅरेट साठी 71 हजार रुपये 18 कॅरेट साठी 59 हजार पाचशे रुपये तसेच 14 कॅरेट साठी 39 हजार 600 रुपये दर नोंदवले गेले आहेत. 24 तासांमध्ये सोन्याच्या दरामध्ये दोनशे रुपयांची घसरण नोंदवली आहे. तसेच 22 कॅरेट मध्ये शंभर रुपये 18 कॅरेट मध्ये दोनशे रुपये आणि 14 कॅरेट मध्ये शंभर रुपये दराने घसरण झाले आहे.

चांदीचा दर Silver Rate

नागपुरातील सराफ बाजार उघडल्यानंतर चांदीचे दर 88 हजार पाचशे रुपये प्रति किलो होते. त्यानंतर दुपारून 88 हजार 700 रुपये प्रति किलो गेले. त्यामुळे आता सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी चांदीच्या दारात दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे.

Leave a Comment