Gold Price Today | नागरिकांसाठी एक टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. लग्नसरा सुरू असताना सोन्याच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यांमध्ये सोन्याचे किमतीमध्ये तुफान वाढ झाल्यामुळे नागरिकांना मोठा महागाईच्या झळा सहन करावा लागत आहेत. Gold Price Today
मार्च महिन्यामध्ये सोन्याचे किमतीने चक्क रेकॉर्ड मोडले आहे. एन लगन सराई मध्येच सोन्याच्या किमती गणनाला भिडल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. अशा परिस्थितीमध्ये एवढे महाग सोने कसे खरेदी करायचे असा प्रश्न नागरिकांपुढे पडला आहे.
गेल्या दहा दिवसांपासून सोन्याची किमती 3430 रुपयांनी तर चांदीच्या किमती 2300 रुपयांनी वाढलेले आहेत. त्यामुळे सोन्याचे किमती 66 हजाराचा टप्पा ओलांडला तर चांदीने 75 हजार रुपयांच्या पुढे डोकुन पाहिले आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये किमती सातत्याने घसरन व चढउतार सुरू होता. परंतु मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या किमती तुफान वाढलेले आहेत. एक मार्च ते 10 मार्च दरम्यान सोन्याच्या किमती तब्बल 3430 वाढलेल्या आहेत.
तसेच या आठवड्यात सोन्याचे किमती दहा मार्च ते 11 मार्च रोजी किमती मोठे बदल झाले. बारा मार्च रोजी किमती किरकोळ 10 रुपयांनी कमी झाल्यावर गुड रिटर्न्स वर दिलेल्या माहितीनुसार 22 कॅरेट सोन्याची किंमत 60,880 रुपये तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 66 हजार 400 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
चांदीच्या किमतीत ही झाली वाढ
सोन्याबरोबर चांदीची किमती देखील वाढ झालेली दिसून येत आहे. मार्च महिन्यामध्ये चांदीच्या किमती तब्बल तीन हजार रुपयांनी वाढले आहेत. गेल्या आठवड्यामध्ये चांदीची किंमत 2300 रुपयांनी वाढली होती. तरी या आठवड्यात सोमवारी पहिल्या दिवशी चांदीची किंमत शंभर रुपयांनी उतरली त्यानंतर 12 मार्च रोजी सोन्याची किंमत पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे गुड रिटर्न्स वर दिलेल्या माहितीनुसार एक किलो चांदीचा भाव आता 76 हजार 100 रुपये आहे.