Gold Price News: नवीन वर्ष सुरू झाल्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. येत्या एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थसंकल्पाच्या घोषणा अगोदरच सोने-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे समोर आले आहे. आज 30 जानेवारी 2025 ला सोन्याच्या दरात तब्बल 1,000 रुपयाची वाढ झाली आहे. 2025 च्या सुरुवातीपासूनच सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत.
अर्थसंकल्प सादर होण्याआधीच सोने-चांदीचे दर वाढल्यामुळे सरकार बजेटमध्ये कस्टम ड्युटी बद्दल काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील बजेटमध्ये कस्टम ड्युटी घट झाली होती त्यामुळे सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले होते. मात्र या अर्थसंकल्पात कस्टम ड्युटी वाढू शकते, त्यामुळे आता याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर होऊ शकतो. Gold Price News
आज 30 जानेवारी 2025 ला भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत 83 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या भावातही आज तेजी पाहायला मिळाली आहे. आज एक किलो चांदीचे दर 96 हजार चारशे रुपये एवढा झाला आहे. देशातीलमोठ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत. याबाबत सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
- दिल्ली: दिल्लीमध्ये आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 83010 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 76,110 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.
- मुंबई: आज मुंबई शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 81860 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 960 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे.
- कोलकत्ता: आज कोलकत्ता मध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 81860 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 960 प्रति दहा ग्राम एवढे आहे.
- चेन्नई: आज चेन्नई शहरामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 82860 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 610 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे.
- अहमदाबाद: अहमदाबाद शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 82430 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 610 रुपये एवढे आहे.
- लखनऊ: लखनऊ मध्ये 24 ट सोनची किंमत 82,580 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 710 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे आहे.
- जयपुर: जयपुर मध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 580 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 710 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे.
- पटना: पटनामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 82580 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 710 रुपये प्रति दहा ग्राम एवढी झाली आहे.
- हैदराबाद: हैदराबाद शहरामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 82430 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 560 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे.
- बंगळूरू: बेंगलोर शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 82430 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 560 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे.
Disclaimer: आम्ही दिलेले सोन्याचे दर इंटरनेट द्वारे माहिती घेऊन दिलेले आहेत. या दरामध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्ज मिळवलेले नसतात. त्यामुळे स्थानिक ज्वेलर्सच्या दरामध्ये व आमच्या घरामध्ये थोडाफार फरक होऊ शकतो. अचूक दर जाणून घेण्यासाठी स्थानिक ज्वेलर्स सोबत संपर्क साधा.