Gharkul Yojana : राज्यातील जनतेसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. प्रधानमंत्री आवास ग्रामीण प्लस योजनेअंतर्गत यंदा २० लाख गरिबांना पक्की घरे दिले जाणार आहेत. तर पुढील पाच वर्षात सर्वांना पक्के घर देण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझ्यासाठी राजकारण सवेचे माध्यम आहे. नागपूर यांना अभिमान वाटेल असं काम करण्याचा प्रयत्न मी करत आहे. लोककल्याणकारी योजनेचा बोजा अर्थसंकल्पना येतो. मात्र या सर्व गोष्टीची नियोजन सरकारने केलेले आहे. तीन वर्षात उद्योगासह सर्वश्रेणीचे विजेचे दर स्वस्त व्हावे तसे व्यवस्था करण्यात आलेली आहे . तसेच दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाण यांनी गृहनिर्माण योजनेच्या अटी शीथीलता करण्याचे राज्य सरकारची मागणी मान्य केलेली आहे. Gharkul Yojana
लाभार्थ्यांनी दहा टक्के निधी जमा करण्याची अट काढून टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे आता गरिबांना सहज पके घरे मिळू शकणार आहेत. राज्य सरकार आता वीस लाख गरिबांना हक्काची घरे देणार आहे. यासोबत या घरांमध्ये सोलार रूप ट टॉप बसवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे घरकुलधारकांना मोफत विज मिळणार आहे.
महायुती सरकार सत्तेवर येताच केंद्र सरकारकडून राज्याला मोठे गिफ्ट मिळालेले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी वीस लाख घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चव्हाण यांनी याबाबत घोषणा केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्यात आता एका वर्षात वीसला घरकुलांना मंजूर देण्यात आलेली आहे. याचा लाभ जे जे बेगर आहेत त्यांना सर्वांना मिळणार आहे. विशेषता; लाडका शेतकरी आणि लाडक्या बहिणींना याचा लाभ देण्याचा प्रयत्न असेल असेही देवेंद्र फडणीस यांनी यावेळी म्हटले आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना हक्काच्या पैशासोबत हक्काचे घर देखील मिळणार आहे.