Gay Gotha Anudan Yojana 2023 : केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजना राबवत असते त्या योजनेचा शेतकऱ्यांना आर्थिक व सामाजिक विकास व्हावा यासाठी मदत करत असते महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी विविध प्रकारचे सरकारी योजनांची सुरुवात करत असते. त्या एका योजना पैकी एक गाई गोठा अनुदान योजना (Gay Gotha Anudan Yojana 2023) आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या गुराढोरांसाठी शेड बांधण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाते.
Gay Gotha Anudan Yojana 2023
आपल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई म्हशी शेळ्या कोंबड्या असे गुरेढोरे असतात पण त्यांना राहण्यासाठी पक्क्या स्वरूपाचे ठिकाण नसते व पावसाळ्यात उन्हाळ्यात जनावरांना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होतात व शेतकऱ्यांसोबत जनावरांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान निर्माण होत असते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला आता गाय गोठा अनुदान ( Gay Gotha Anudan Yojana 2023 ) दिले जाणार आहे.
तर आम्ही या लेखांमध्ये गाय गोटा अनुदान योजनेची संपूर्ण माहिती दिली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांना या योजनेचा लाभ तुम्हाला जर मिळवायचा असेल तर ही माहिती काळजीपूर्वक वाचा व ज्या शेतकऱ्यांना गाई गोठा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
गाय गोठा अनुदान 2023 ( Gay Gotha Anudan Yojana 2023 )
- योजनेचे नाव – गाय गोठा अनुदान योजना
- योजनेची सुरुवात – 3 फेब्रुवारी 2021
- विभाग – कृषी विभाग
- योजना कोणी सुरू केली – महाराष्ट्र शासन
- लाभार्थी – महाराष्ट्र मधील ग्रामीण भागातील शेतकरी
- लाभ – जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी अनुदान
- योजनेचा उद्देश – शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे
- अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
गाय गोठा अनुदान योजनासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ( Gai Gotha Anudan Yojana Documents 2023)
- अर्जदाराचा रंगीत आकाराचा पासपोर्ट फोटो
- अर्जदाराचे आधार कार्ड झेरॉक्स
- अर्जदाराचे रेशन कार्ड झेरॉक्स
- अर्जदार शेतकरी असणे आवश्यक
- अर्जदाराकडे मतदान कार्ड असणे आवश्यक
- अर्जदाराचा कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक
- मोबाईल क्रमांक
- अर्जदार ग्रामीण भागात राहणारा रहिवासी असावा
- जातीचे प्रमाणपत्र
- आदिवासी प्रमाणपत्र
- जन्माचे प्रमाणपत्र
- या योजनेआधी शासनाचे इतर कोणत्या योजनेअंतर्गत गोट्याचा लाभला घेतल्याबद्दल घोषणापत्र जोडणे आवश्यक
- शेतकऱ्याला ज्या जागेवर शेड बांधायचे आहे. तेजागेच अर्जदाराचे सह हिस्से दाराचे संमतीपत्र / ना हरकत प्रमाणपत्र
- ग्रामपंचायत शिफारस पत्र
- अर्जदाराकडे अल्पभूधारक प्रमाणपत्र असणे आवश्यक
- अर्जदाराकडे पशुधन पर्यवेक्षक, सरपंच व ग्रामसेवक यांनी दिलेले पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र असणे आवश्यक.
- अर्जदारांना जनावरांसाठी गाय गोठा बांधायचे अंदाजपत्रक सोबत जोडणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र व जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
गाय गोठा अनुदान फॉर्म डाऊनलोड करा
गाय गोठा अनुदान योजनेसाठी अर्ज कुठे करायचा (Where to Apply for Cow Gotha Subsidy Scheme)
- गाय गोठा अनुदान योजनेसाठी अर्जदाराने गावातील ग्रामपंचायत ग्रामसेवकाकडे सर्व कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावे .
शेतकरी मित्रांना अशा सोप्या पद्धतीने योजनेविषयी माहिती हवी असेल तर आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला शासनाच्या नवीन योजनेविषयी माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायांचा वापर करा