Gas cylinder Rate : महागाईच्या काळात नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून यामुळे महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये काही चढ-उतार पाहायला मिळाले असले, तरी स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. Gas cylinder Rate
सरकारचा मोठा निर्णय!
जागतिक परिस्थितीचा आढावा घेतला तर सध्या जगभरामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या इंधन धोरणामुळे तेलाच्या दरामध्ये आर्थिक स्थैर्य दिसून येत आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये भारत सरकारने आपल्याकडील नागरिकांना महागाईपासून वाचवण्यासाठी व्यावसायिक दर स्थिर ठेवण्याचा निर्णय कायम ठेवलेला आहे. यामुळे घरगुती ग्राहकांना दिलासा मिळाला असून एलपीजी गॅस च्या किमती सौदी अरेबियाच्या तुलनेत स्वस्त असल्याचे स्पष्ट करण्यात आला आहे.
तेल कंपन्यांना मोठा तोटा
गेल्या पंधरा महिन्यांमध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही मोठा तोटा सहन करत किमती वाढवलेल्या नाहीत. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांनी कोट्यावधीचा तोटा सहन केला आहे. या तोट्याची भरपाई करण्यासाठी आता केंद्र सरकारकडून मोठ्या अनुदानाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
30 ते 35 हजार कोटींच्या अनुदानाचा विचार
काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार या तीन प्रमुख सरकारी तेल कंपन्यांना जवळपास 30000 ते 35000 कोटी रुपयाचा अनुदान देण्याच्या तयारीत आहे. अर्थ मंत्रालय या अनुदानाच्या गणितावर काम करत असून, कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासोबतच ग्राहकांवर त्याचा भार न जाण्याची जबाबदारी घेतली जात आहे.
एप्रिल महिन्यात उभा केला 32 हजार कोटींचा अतिरिक महसूल
दरम्यान, केंद्र सरकारने एप्रिल महिन्यात पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवून जवळपास 32000 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल उभारला आहे . या अतिरिक्त निधीचा वापर एलपीजी टोट्याची भरपाई करण्यासाठी करण्यात येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो.
सध्या एलपीजी गॅस सिलेंडरचा सारांश पाहता घरामध्ये स्थिरता राखून सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी एक सकारात्मक पाऊल उचललेला आहे. तेल कंपन्यांना होणाऱ्या तोट्याची भरपाई आता सरकार करत असल्याने, घरगुती गॅस स्वस्तंच राहण्याची शक्यता पडेल काळात कायम राहू शकते. त्यामुळे आता स्वयंपाक घरातील गॅस घराची चिंता काही काळ बाजूला ठेवायला हरकत नाही!
( Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारित आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही. बातमीचे सविस्तर पडताळणी करा.)