Gas Cylinder Price : नागरिकांसाठी मोदी सरकारने राखी पौर्णिमेच्या दिवशी मोठे गिफ्ट दिले आहे घरगुती सिलेंडरच्या किमतीत उद्यापासून दोनशे रुपयांनी कमी होणार राखी पौर्णिमा निमित्त देशातील नागरिकांना मोदी सरकार मोठे गिफ्ट दिला आहे.
देशभरातील महिलांना नरेंद्र मोदी सरकारने राखी पौर्णिमेच्या एक दिवशी आधीच मोठे गिफ्ट दिले आहे बुधवारपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती ( LPG Gas Price) दोनशे रुपये कमी होणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलेली आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या निर्णयाबाबत सांगितले की पुनम आणि राखी पौर्णिमेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील महिलांना गिफ्ट दिला आहे बुधवारपासून देशातील घरातील घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती दोनशे रुपये तुम्ही करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे उज्वला गॅस अंतर्गत 75 लाख भगिनींना मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहेत. त्यासाठी त्यांना एकही रुपये द्यावा लागणार नाही. पाईप टू आणि सिलेंडर मोफत मिळणार आहे जगभरातील ज्या किमती वाढला आहे मात्र पण भारतात त्याचा परिणाम कमी आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ अनुराग ठाकूर म्हणाले की उज्वला योजनेअंतर्गत यापूर्वी दोनशे रुपये अनुदान दिले जात होते तर आजपासून त्यावर दोनशे रुपयांचे तरी अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे म्हणजे आता उज्वला योजनेअंतर्गत येणाऱ्या नागरिकांना चारशे रुपये अनुदान देण्यात येणार आहे 33 कोटी लोकांकडे गॅस सिलेंडर कनेक्शन आहेत त्याचबरोबर 75 लाख नवीन कनेक्शन दिले जाणार आहे त्यासाठी 7680 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
मोदी सरकार 2014 सली सत्तेत आले होते तेव्हा १४.5 कोटी लोकांकडे गॅस कनेक्शन होते व आता देशातील 33 कोटी लोकांकडे गॅस कनेक्शन असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
आता घरगुती गॅस सिलेंडरची किंमत अकराशे रुपयांच्या वर नसून मोदी सरकारच्या या ताज्या निर्णयामुळे बुधवारपासून सिलेंडरची किंमत 900 रुपये पर्यंत कमी होणार आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांना आणि मध्यवर्गयांना मोठा दिलासा मिळणार आहे.