Five beautiful places in Maharashtra : जगण्याच्या रोजच्या डोकेदुखीतून थोडासा बाहेर पडायचा आहे, जर तुम्हाला ऑफिस, ट्राफिक, याच्या वजामधून थोडसं बाहेर फिरायला जायचं आहे. अशावेळी हिरवागार निसर्गात जाऊन तुम्ही मनाला शांत करू शकता. परंतु तुम्हाला काही ठिकाणी माहित आहे का तिथे जाऊन तुम्ही खरंच मनाला गारवा आणि एक जादुई अनुभव मिळणार आहे. पावसाळा आला की निसर्ग त्याची वेगळी जादू दाखवतो. खरच तर आपण म्हणतो महाराष्ट्रात निसर्ग इतका कसा सुंदर आहे. महाराष्ट्र मध्ये अनेक असे ठिकाणे आहेत जिथे गेल्यावर ते आपल्याला भारी अनुभव मिळतो. धुक्याच्या पदराआड लपलेली डोंगर, आणि धबधब्यांचा आवाज, झाडांवरचा टवटवीत हिरवं अंगण, हे सर्व अनुभवायचं असेल, तर खूप लांब जायची गरज नाही भाऊ. आपला महाराष्ट्रातच अशी ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही अगदी कमी खर्चात, ऑफिसची एक दोन सुट्ट्या मिळवून, छोट्याशा बॅग घेऊन निघू शकता तरी आठवडाभर ताजेवान होऊन परत येऊ शकता. चला तर जाणून घेऊया काही पाच ठिकाण.Five beautiful places in Maharashtra
लोणावळा : महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण म्हणजे लोणावळा. मुंबई पुण्याच्या मधोमध असलेले हे ठिकाण म्हणजे मान्सूनच्या काळातील एक छोटास निसर्ग स्वर्ग. टायगर पॉईंट, लॉयन पॉईंट, भुशी डॅम इथं पावसाळ्यात जाऊन बसलात की, जगाची सगळी गडबड विसरला होते. धुक अंगावर घेऊन चहा प्यायचा, गरम भजी खायचे आणि मनसोक्त फोटो काढायचे, अशा सुंदर क्षणांची मेजवानी म्हणावी लागेल. आणि प्रवासीही सोपा, तुम्ही या ठिकाणी रेल्वे, बस किंवा गाडीने देखील जाऊ शकता. परंतु मित्रांनो या ठिकाणी गेल्यावरती आपल्याला निसर्गाची काळजी घ्यायची आहे. या ठिकाणी कचरा प्लास्टिक हे व्यवस्थित किती दिलेल्या डस्टबिनमध्ये टाकायचे आहे.
माळशेज घाट : माळशेज घाट म्हणजे एक स्वर्गाचा प्रवास, कोणत्याही मोठ्या शहरांपासून फारच लांब नाही आणि तरीही शहरांच्या तटापासून दूर अस हे ठिकाण. माळशेज घाटामध्ये गेल्यावरती ना तुम्हाला तिथे मोठे हॉटेल दिसणार, ना गर्दी, फक्त निसर्ग. जाताना सुट्टीच्या दिवशी जाऊ नका त्यादिवशी खूप जास्त गर्दी होते. तुम्हाला या ठिकाणी झाडांच्या झावळीतून वाऱ्यांचा आवाज, डोंगरावरून कोसळणारे धबधबे, आणि रस्त्यांच्या दोन्ही बाजूला पसरलेली हिरवळ. रोड ट्रीपच्या मूडमध्ये असाल, तर माळशेज घाट एकदा पाहूनच या. मोबाईलचा नेटवर्क ही अधून मधून गायब होतो, पण त्यातच खरी मजा असते, कारण मन शांत होतं. माळशेज घाट इतका सुंदर आहे की असं वाटतं इथेच राहावं.
पन्हाळा : कोल्हापूर पासून अगदी जवळ असलेले हे ठिकाण केवळ ऐतिहासिक नाही, तर निसर्गरम्य आहे. पावसाळ्यात पन्हाळागडच्या चहूबाजूने हिरवळ पसरते. आणि ढग घाटांवर खेळतात. शिवरायांची आठवण, आणि आपल्यालाही इतिहासाची जाणीव आणि निसर्गाची साथ मिळते. पन्हाळ्याची सहल ही केवळ ट्रीप नसते, ती एक अनुभव आहे. पावसात ओल्याझालेल्या किल्ल्यांच्या भिंती आणि दाट दुखी आड लपलेल्या वाटा मनाला भुरळ घालतात.
माथेरान: मुंबई किंवा पुण्यात राहत असाल आणि फार लांब जायचं नसेल, तर माथेरान हा उत्तम पर्याय आहे. इथे गाड्यांना परवानगी नाही, त्यामुळे हवेत गारवा आणि वातावरणात शांतता कायम. टॉय ट्रेन, घोडेस्वारी, सनसेट पॉईंट… हे सगळं अनुभवायला वाटतं, आपण खरंच एकदा फॉरेस्ट फिल्म मधून फिरतोय. पावसाळ्यामध्ये इथे येणे म्हणजे मनाला पुन्हा रिफ्रेश करणे.
महाबळेश्वर : पश्चिम घाटात वसलेलं हे ठिकाण म्हणजे पावसाळ्यातलं परफेक्ट हिल स्टेशन. इथली स्ट्रॉबेरी फेमस असली, तरी पावसात धबधबे, घाटांचे रस्ते, आणि थोडा रोमँटिक थंडावा यामुळे महाबळेश्वर कधीही विसरणं शक्य नाही. वेसावी पॉईंट, एलफिनस्टन पॉईंट, प्रतापगड ही सगळी ठिकाणं पावसात नवं रूप धारण करतात. कुटुंब, मित्र किंवा जोडीदारासोबत कोणाही सोबत या ट्रिप लक्षात राहणार.
तर आमच्या digitalpor.in टीमच्या माध्यमातून तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती निसर्ग हा खूप सुंदर आहे परंतु त्याची सुंदरता जपणे ही आपली जबाबदारी आहे. पावसाळ्यात फिरायला जात असताना निसर्गाची काळजी घ्या. प्लास्टिक टाकू नका, स्वच्छता ठेवा. कारण हा निसर्ग आपलाच आहे.
हे पण वाचा | महाराष्ट्रातील एक गाव, जिथे दिवस फक्त 6-7 तासांचा असतो. स्वर्गाहून सुंदर आहे. हे ‘गाव’