Fisheries Farming Loan | नमस्कार मित्रांनो आता राज्यातील शेतकरी हे शेतीबरोबरच व्यवसायाला सुद्धा सुरुवात करत असतात. अशातच आता मासे पालन हा व्यवसाय सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना घरबसल्या कर्ज भेटणार आहे. मासे पालन हा व्यवसाय सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना जास्त भांडवलाची गरज असते यामुळे शेतकऱ्यांना बँकेच्या दारात जावे लागते.
किसान क्रेडिट कार्डवर या शेतकऱ्यांना मासे पालन हा व्यवसाय करण्यासाठी घरबसल्या कर्ज मिळवता येणार आहे. केंद्र सरकारच्या या जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी हा मासे पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी हे भांडवल उभे करू शकतात. म्हणून मासेपालन उद्योगाच्या भांडवलासाठी पारदर्शकता आणण्यासाठी मदत होणार आहे.
काय आहे हे जन समर्थ पोर्टल?
केंद्रीय मासे पालन मंत्रालयाच्या या संयुक्त सचिव सागर मोहरा यांनी यासंदर्भात मध्ये म्हटले आहे, की सरकारचे जन समर्थ पोर्टल हे शेतकऱ्यांना सर्व कर्ज व योजनांसह मासे पालन हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आलेले एक एक ग्रुप पोर्टल आहे.
जन समर्थ पोर्टल द्वारे शेतकऱ्यांना मासे पालन व्यवसाय करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने भांडवल हे आता उभे करता यावे यासाठी सरकारी पातळीवरून सातत्याने हे प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून जन समर्थ पोर्टल हे उभारण्यात आले आहेत. यामुळे देशातील मासे पालन व्यवसायांचा विकास हा होण्यासाठी मदत होणार आहे.
तीन लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची केसीसी
आपल्या भारत देशातील मासे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना या किसान क्रेडिट कार्डद्वारे मासे पालन व्यवसाय करण्यासाठी भांडवल हे उभे करता यावे यासाठी सरकारी पातळीवरून जागरूकता ही निर्माण केली जात आहे.
ज्याद्वारे आतापर्यंत आपल्या भारत देशातील तीन लाखाहून जास्त शेतकऱ्यांचे केसीसी कार्ड हे बनवण्यात आले आहेत. त्यालाच जोडून आता मासे पालन या व्यवसायाच्या भांडवलासाठी पारदर्शकता आणण्यासाठी जन समर्थ पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे. भारतातील मासे पालन करणारे शेतकरी हे किसान क्रेडिट कार्डद्वारे या जन समर्थ पोर्टलवर अर्ज करू शकतात. अशी माहिती सचिव सागर मोहरा यांनी दिलेली आहे.
25 हजार कोटी रुपयांचा निधी
काही दिवसांपूर्वीच या केंद्रीय मासे पालन व दुग्धविकास विभागाचे मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी पशुपाला करणाऱ्या शेतकऱ्यांना व मासे पालन हा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना केसीसी कार्ड हे वाटप करण्यात आले होते. या शिवाय केंद्र सरकारकडून केसेस्सीच्या माध्यमातून या दोन व्यवसायांसाठी 25 हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप लक्ष हे निर्धारित करण्यात आले आहेत.