राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही! अर्थमंत्र्यांनी सांगितली स्पष्ट..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer News: नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मारुती सरकारने अंतिम अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना लागली होते. यासंदर्भात अर्थमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका दिली आहे.

कर्जमाफी बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

महायुती सरकारने 44 लाख 66 हजार शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज देण्याची आणि खरीप हंगामा 2023 24 साठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टर च्या मर्यादित प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचे, दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपयाची अनुदान, महिलांसाठी एक वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत, लाडली बहन योजना अशा महत्त्वपूर्ण घोषणा अर्थसंकल्पामध्ये केले आहे.

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची शक्यता?

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीची शक्यता फेटाळली आहे. कर्जमाफी देण्यात की राज्याची आर्थिक स्थिती भक्कम नसल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षरीत्या सुचित केले आहे. आणि कर्जमाफी या विषयावर अधिक बोलणे टाळले आहे.

शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप! अर्थसंकल्पेत राज्य सरकारची मोठी घोषणा..

अर्थमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत झोपेल तेवढाच खर्च केला पाहिजे अशा शब्दांचा वापर करून राज्यातील कर्जमाफी देण्याच्या स्थितीत नसल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे. याशिवाय दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना केवळ गाईच्या दुधासाठीच प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळणार आणि इतर दोन साठी हे अनुदान मिळणार नाही असेही पवार यांनी स्पष्ट सांगितले.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या हनी नुकसान भरपाई वाढ करण्यात आली आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या जीवघम होणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाला मिळणारी वीस लाख रुपये ची रक्कम वाढवून 25 लाख रुपये करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कायमचे अपंगत्व असल्यास आता सात लाख पन्नास हजार रुपये, गंभीर जखमी झाल्यास पाच लाख रुपये मिळणार आहेत.

मोठी खुशखबर! 1 जुलैपासून नवीन नियम लागू, शिधापत्रिकाधारकांना रेशन सोबत मिळणार 5000 रुपये, हे काम करा लगेच

किरकोळ जखमी झाल्यास पन्नास हजार रुपयाची अनुदान अशी वाढ यामध्ये करण्यात आली आहे. वन्य प्राण्यांमुळे शेती पिकाचे नुकसान भरपाई करिता रकमेच्या कमाल मदतीत 50 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

ई – पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू करण्याचा निर्णय

झालेल्या नुकसानीचे ई -पंचनामे होणार पंचनामे जलद आणि पारदर्शक होण्यासाठी ई – पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सिंचन प्रकल्पाला बळ देण्यात येणार आहे. सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार असून 108 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कांदा उत्पादकांना मदत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सन 2023 24 मध्ये 350 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 851 कोटी 66 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कांदा सोयाबीन आणि कापूस यांची हमीभावामध्ये खरेदी करण्यासाठी प्रत्येकी दोनशे कोटी रुपयांचा फिरता निधीची तरतूद करण्यात आली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही! अर्थमंत्र्यांनी सांगितली स्पष्ट..”

Leave a Comment