Farmer Income Tax News | देशामध्ये शेती उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा आयकर घेतला जात नाही. देशभरातील शेतकऱ्यांना सध्या सरसकट कर सवलती आहेत. परंतु केंद्रातील मोदी सरकार यामध्ये लवकरच बदल करण्याची शक्यता आहे. शेती मधून मिळणारे उत्पन्नावर लवकरच आयकर च्या कक्षेत येणार असल्याची माहिती समोर येत आहे. यंदाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी या चर्चेवर उदान आले आहे.
लवकरच देशातील कर प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी, श्रीमंत शेतकऱ्यांवर आयकर लागू करण्याबाबत सरकारचा विचार सुरू आहे. अशी माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरणात समितीच्या सदस्य अशीमा गोयल यांनी पी टी आय या वृत्तसंस्थेला दिले आहे.
केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पी एम किसान सारख्या योजना राबवत आहे याची भरपाई करण्यासाठी सरकार श्रीमंत शेतकऱ्यांवर आयकर लावू शकते यामुळे कर प्रणाली निष्पकता येईल असे गोयल यांची मत आहे.
भारतामध्ये एकूण तीन टक्के शेतकरी श्रीमंत आहेत. शेतकऱ्यांना अशा अनेक योजनेच्या माध्यमातून सरकार आर्थिक मदत करते. याची भरपाई करण्यासाठी अधिक कमाई करणाऱ्या शेतकऱ्यांनाच आयकर लागू करण्याचा सरकार विचार करत असल्याचे गोयल यांनी म्हटले आहे.
याबाबत बोलताना गोयल म्हणाले की, एक हाती सत्ता असलेले सरकार असे कायदे करू शकते. परंतु विरोधकांची बाजू ऐकून घेणे महत्त्वाचे आहे. उत्पादन क्षमता वाढवणाऱ्या नाविन्यपूर्ण गोष्टींना चालना मिळाली तर भारत देश लवकर श्रीमंत होऊ शकतो. यासाठी विवेक पूर्ण नियमानद्वारे सुरक्षित वैयक्तिक स्वतंत्र आणि संतांची सुव्यवस्थित सरकारी सुविधा आवश्यक आहे.
अर्थात शेतकऱ्यांना सरकारी नकारात्मक आकाराच्या स्वरूपामध्ये असते. त्यामुळे शेतीतून अधिक उत्पन्न मिळवणाऱ्या शेतकऱ्यांवर हा कर लावण्याचा सरकार विचार करत असल्याचे यावेळी सांगितले.