शेतकरी ओळखपत्र कसे काढावे, कोणती कागदपत्र आवश्यक? जाणून घ्या सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer ID Scheme: आपल्या देशातील शेतकरी व शेती क्षेत्रात आधुनिकता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सरकारने सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र तयार करण्याची घोषणा केली आहे. सरकारने 2026-27 पर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांसाठी डिजिटल शेतकरी ओळखपत्र तयार करण्याचे टार्गेट ठेवले आहे. शेतकऱ्यांना इथून पुढील सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र असणे अतिशय आवश्यक आहे. या लेखामध्ये आपण शेतकरी ओळखपत्र कसे काढावे व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

शेतकरी डेटाबेस मध्ये देशभरातील सर्व शेतजमीन धारक शेतकरी तसेच महिला शेतकऱ्यांचा समावेश असेल. शेतकरी ओळखपत्र मध्ये जमिनीच्या नोंदणी ची माहिती जोडली जाणार आहे. वारसा आणि जमिनीच्या व्यवहाराचा समावेश करण्यासाठी राज्य सरकारकडून जमिनीच्या नोंदीशी संबंधित माहिती याद्वारे अपडेट केली जात आहे. शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा लाभ घेणे आणखीन सरळ आणि सुलभ व्हावे यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. शेतकरी ओळखपत्र योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक व शेती संबंधित फायदा मिळणार आहे.

या 55000 लाडक्या बहिणींना मिळणार नाही आठवा हप्ता; तुम्हाला मिळणार का नाही? पहा येथे

शेतकरी ओळखपत्राचे फायदे काय?

शेतकरी ओळखपत्र तयार केल्यानंतर शेतकऱ्यांना पी एम किसान योजना पिक विमा योजना यासोबतच सरकार द्वारे चालवल्या जाणाऱ्या इतर योजनेचा लाभ मिळणे अधिक सोपे आणि सुलभ होणार आहे. शेतकऱ्यांना अनुदान आणि कर्ज मिळणे देखील अगदी सोपं होणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदीचे तपशील डिजिटल पद्धतीने सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत. सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी वारंवार केवायसी करण्याची शेतकऱ्यांना गरज भासणार नाही. ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. तसेच योजनेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून शेतकरी दूर राहणार आहेत. यासोबतच योजनेचे फायदे योग्य शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचवले जाणार आहेत. बनावट शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळणे अशक्य होणार आहे.

हे पण वाचा | कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ! आवक देखील वाढली; जाणून घ्या आजचे कांद्याचे दर

शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी पात्रता

शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी सर्वप्रथम अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या नागरिकांच्या नावावर शेतजमीन असणे देखील आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे शेतजमींचे कागदपत्रे असणे आवश्यक आहे. Farmer ID Scheme

हे पण वाचा | आज सोन्याचे दर काय आहेत? जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट सोन्याचे दर…

आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • बँकेचे पासबुक
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • जमिनीचे कागदपत्र
  • शेतकऱ्यांचे फोटो
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
  • इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.

हे पण वाचा | लाडकी बहिणी योजनेतून या महिला होणार अपात्र..! अजित दादांनी दिली महत्त्वाची माहिती

शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी अर्ज कसा करावा?

शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला ॲग्रोस्ट्रिक च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्या ठिकाणी फार्मर लॉग इन करून तुम्ही शेतकरी ओळखपत्रासाठी विचारलेली सर्व माहिती भरून अर्ज करू शकतात. याशिवाय तुम्ही तुमच्या जवळील CSC केंद्रात जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर आवश्यक आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment