शेतात जायला रस्ता नाही? तर चिंता करू नका, या योजनेअंतर्गत कायमस्वरूपी मिळणार रस्ता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farm road Yojana | शेतकऱ्यांना शेतात जायला अडचण होते, तुमच्या शेतात जाताना दगड धोंड्याचा रस्ता आहे. तर चिंता नको आता शासनाच्या माध्यमातून तुम्हाला कायमस्वरूपी रस्ता मिळणार आहे. हो, हे खर आहे. आणि ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. कशा पद्धतीने तुम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता मिळणार हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्यासाठी हा लेख सविस्तरपणे वाचा. Farm road Yojana

शेतकऱ्यांच्या शेतामधून जात असताना पावसाळ्यात किचकट रस्त्यांमुळे ट्रॅक्टर अडकतात, शेतातील आपला माल, बाजारात घेऊन जायचे झाल्यास किंवा घरी आणायचा झाल्यास वेळ लागतो. यामुळे शेतकऱ्यांना मोठी कष्ट घ्यावा लागतात. परंतु आता हे चित्र बदलणार आहे. कारण राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत रस्ता पोहोचण्याचा निर्धार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली आहे की, ही योजना संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी जीवनातला खराखोरा बदल घडवून आणणारी ठरणार आहे.

सध्याच्या घडीला शेतकऱ्यांसमोर सध्या शेतातील रस्ता सगळ्यात मोठा प्रश्न आहे. यामुळे शेतात जर कुठला प्रयोग करायचा म्हटलं तर रस्ता व्यवस्थित नाही रानात गाडी जात नाही. जर रानात पिकवलेला शेतातील पीक घरी घेऊन जायचं म्हटलं तर मोठे धावपळ करावे लागते. विशेषता दुर्गम, आदिवासी, डोंगराळ भागात शतक पोहोचण्यासाठी गाडी तर सोडाच, पायवाटाही अनेक ठिकाणी उरलेल्या नाहीत. त्यामुळे शासनाने आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकात्मिक पद्धतीने लक्ष केंद्रित करत मोठा निर्णय घेतलेला आहे.

समग्र योजना म्हणजे काय?

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली जाणार आहे. ही समिती क्षेत्र रस्त्यांवर कार्यरत असलेल्या विविध योजना – ग्रामविकास, रोजगार हमी, 25-15 योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना इत्यादी यांचा समन्वय साधून क्षेत्ररस्त्यांसाठी स्वतंत्र लेखी शीर्षक तयार करणार आहे.

या समितीला एका महिन्याच्या आत उपायोजनांचा अहवाल सादर करायचा आहे. आणि त्यानंतर राज्यात ठोस कारवाई होणार आहे. इतकंच नव्हे तर प्रत्यक्ष येतात रस्ता किमान 12 फूट रुंद असणारा असून, शेत रस्त्यांना क्रमांक देण्याचं काम जमाबंदी आयुक्तांमार्फत सुरू होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा का?

शेतमाल वेळेत पोहोचता आला नाही, तर भाव मिळत नाही. तसेच दोन शेतकऱ्यांमधील वाद यामुळे शेतात एकमेकांना रस्ता मिळत नाही. हे देखील या माध्यमातून प्रश्न सुटतील असं वाटत आहे. या सर्व अडथळ्यांना पूर्णविराम देणारी ही योजना आता शेतकऱ्यांच आयुष्य सोपं करणार आहे.

यामध्ये चालू वहिवाट रस्त्यांचे सर्वेक्षण, गाव नकाशात रस्त्यांची नोंद, लोक अदालितिद्वारे वाद निवारण, हे सगळे देखील शासनाकडून वेळेत पूर्ण केल जाणार आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी पष्ट केले आहे की, रस्त्यांचे प्रश्न आत्ता उपविभागीय अधिकाऱ्यांपर्यंत निकाली काढले जाणार आहेत, म्हणजे न्याय मिळाला वर्षानुवर्ष वाट पहावी लागणार नाही.

25- 15 योजनेतून निधी शेतरस्त्यांसाठीच!

आजवर गावातल्या रस्त्यांसाठी असलेल्या 25- 15 योजनेतील 50% निधी क्षेत्र रस्त्यांसाठी वापरण्याचा विचारही सरकार करते. यामुळे गावागावात आता रस्त्यांची जाळी उभारणार आहे. रस्त्यांचं सपाटीकरण, मुरमीकरण किंवा सिमेंट काँक्रेट रस्तेही केली जाणार आहेत. ही रस्ते कायमस्वरूपी असतील आणि सरकारी यंत्रणे कडून त्यांचा वारंवार देखरेख केले जाणार आहे.

योजना महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे त्यांना शेतात जायला रस्ते मिळणार आहेत. बैलगाडी असो किंवा ट्रॅक्टर असो यांना सगळ्यांना दिलासा मिळणार आहे. सध्या ही योजना न राहता शेतकऱ्यांच्या जीवनातील बदल घडवून आणण्यासाठी एक क्रांती घडवणारी पायवाट ठरेल.

हे पण वाचा | शेतात जायला रस्ता नाही का? फक्त एक अर्ज करा, सरकारी खर्चातून करून मिळेल शेतातील रस्ता

Leave a Comment

error: Content is protected !!