Electric Smart Meter: नमस्कार मित्रांनो, महावितरण चे सध्याचे विद्युत मीटर बंद होणार आहेत. जुन्या पारंपारिक मीटरची जागा आता नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर घेणार आहेत. राज्यभरात दोन कोटी 41 लाख ग्राहकांचे मिटर बदलण्यात येणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यात सहा लाख 36 हजार 992 ग्राहकाचे विद्युत मीटर बदलणार आहेत. पुढील तीन-चार महिन्यात जिल्ह्यातील मीटर बदलण्याची मोहीम सुरू होणार आहे.
नवीन स्मार्ट मीटर बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी 797.38 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. नागार्जुन कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांना 7 ऑगस्ट 2023 रोजी काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. कामाचा कालावधी 27 महिन्याच्या आत आहे. Electric Smart Meter
शेतीचे वीज ग्राहक वगळता घरगुती व्यापारी औद्योगिक वीज ग्राहकास फिडर व रोहिंत्राचे सुद्धा स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत. त्या दृष्टीने ठेकेदाराने फिडर व रोहींत्राचे संरक्षण पूर्ण केले आहे. स्मार्ट मीटर बसवल्यावर वीज ग्राहकांना मोबाईल फोन प्रमाणे विजेसाठी पैसे भरावे लागतील. किती वीज वापरली किती रक्कम भरावी लागेल किती रक्कम शिल्लक आहे. याची माहिती ग्राहकांना मोबाईल फोनवर मिळणार आहे.
सोने खरेदी करायची सुवर्णसंधी! सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, येथे 10 ग्रॅम सोन्याची नवीनतम किंमत पहा
त्यामुळे आर्थिक नियोजनानुसार वीज वापर किती करायची हे सुद्धा ग्राहकांना समजणार आहे. सध्याच्या पद्धतीत मीटर रिडींग घेऊन मोठी बिले आल्यावर ग्राहकांचे गणित बिघडते. स्मार्ट मीटर मुळे वीज वापरावर ग्राहकांना नियंत्रण ठेवणे सोपे जाणार आहे. ग्राहकांना घरबसल्या मोबाईल वरून ऑनलाईन स्मार्ट मीटर वर पैसे भरण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
पैसे संपत आल्यावर दोन दिवस अगोदरच मोबाईलवर संदेश पाठवला जाणार आहे. पैसे संपले तरी सायंकाळी सहा ते सकाळी सहा पर्यंत वीजपुरवठा चालू राहील. त्यामुळे अचानक मध्यरात्री वीज बंद होण्याचा धोका निर्माण होणार नाही. संबंधित ग्राहकांनी सकाळी दहापर्यंत पैसे भरून वीजपुरवठा सुरळीत चालू ठेवायचा आहे.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! या लोकांना शिधापत्रिकांच्या यादीतून काढून टाकण्यात आले
त्यातून पैसे संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे पैसे वजा होणार आहेत. स्मार्ट मीटर चे नियंत्रण महावितरणच्या जवळच्या कक्ष कार्यालयात असणार आहे. त्यामुळे मीटरमध्ये छेडछाड करणे ग्राहकांना शक्य होणार नाही. फिडर व रोहित्र याच्यावरही स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत.
त्यामुळे वीज गळतीचा प्रश्न निर्माण होणार नाही. आकडे टाकून विज चोरी बंद होणार आहे. ग्राहकांना नवे प्रीपेड मीटर मोफत दिले जाणार आहेत. यासाठी कुठलाही शुल्क आकारण्यात येणार नाही. मीटरचा खर्च केंद्र सरकारकडून मेलेल्या अनुदानातून व महावितरण तर्फे केला जाणार आहे. राहुरी तालुक्यात घरगुती व औद्योगिक ग्राहकाचे 29412 मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत.
मान्सून महाराष्ट्रात कुठपर्यंत पोहोचला? हवामान विभागाने दिली नवीन मोठी अपडेट..
जिल्ह्यात स्मार्ट मिटर किती?
- ग्राहकांना स्मार्ट मीटर- 636192
- वितरण रोहिंत्रणा – 27045
- फेडरल – 1800
- एकूण स्मार्ट मीटर – 665035
या स्मार्ट मीटर मुळे रीडिंग घेणे, बिले तयार करून ग्राहकांना पोहोचवणे, थकीत विज बिल वसूल करणे अशी कामे कमी होणार आहेत. त्यामुळे मनुष्यबळाचा वापर ग्राहकांना जलद व चांगली सुविधा देण्यासाठी होणार आहे.
4 thoughts on “जुने पारंपारिक मिटर होणार बंद..! महावितरण तर्फे प्रीपेड स्मार्ट मीटर लॉन्च”