नागरिकांसाठी मोठा दिलासा, खाद्यतेल झाले स्वस्त! पहा गोड तेलाचे नवीन दर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Edible Oil Rate: नमस्कार मित्रांनो, देशातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. खाद्य तेलाच्या दरात घसरण झालेली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या किचनचे बजेट सुधारणार आहे. तेल जरी स्वस्त झाले असले तरी तेलकट खाणे टाळावे. केंद्र सरकारने आयात तेलावरील आयात शुल्क 15 टक्क्यावरून शून्यावर आणले आहेत. त्यामुळे खाद्यतेलाच्या दरात घसरण दिसत आहे.

गोड तेलाच्या 15 लिटर डब्याचे नवीन घर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

मागील अनेक दिवसापासून खाद्यतेल, डाळी, अन्नधान्य, मसाले आणि इतर अनेक पदार्थ महागल्यामुळे किचनचे बजेट पूर्णपणे बिघडले होते. पण कोलमडलेल्या किचनच्या बजेटला खाद्यतेलाच्य घसरत्या किमतीमुळे थोडा दिलासा मिळाला आहे. मागील पंधरा दिवसात खाद्यतेलाच्या किमतीत प्रति किलो पाच ते सहा रुपयाची घसरण झाली असून सर्वाधिक विकणारे सोयाबीन तेलाच्या दरात मोठी घसरण दिसून आली आहे. सध्या सोयाबीन तेलाचे भाव 109 रुपये प्रति किलो झाले आहेत.

सोयाबीन तेलाचे सध्याचे दर पाहिले तर मागील तीन वर्षांपूर्वीचे दर आणि आत्ताचे दर सारखेच आहेत. म्हणजे मागील तीन वर्षात सोयाबीन तेलाच्या दरात वाढ झाली होती मात्र आता या घसरती नंतर सोयाबीनचे दर मागील तीन वर्षापूर्वीच्या दराएवढे झाले आहेत. आपण आज गोड तेलाला सध्या किती दर मिळत आहे याबद्दल माहिती घेणार आहोत. Edible Oil Rate

भारतीय स्टेट बँक खाते धारकांसाठी चांगली बातमी! हा फॉर्म लवकर भरा, प्रत्येकाच्या खात्यात 11,000 रुपये जमा होतील

खाद्य तेलाचे दर घसरण्याचे कारण काय?

केंद्र सरकारने आयात तेलावरील आयात शुल्क 15 टक्क्यावरून शून्यावर आणल्या आहे. त्यामुळ सोयाबीन, सूर्यफूल, पाम तेलाच्या आयात वाढली आहे. यावर्षी देशांतर्गत सर्व तेल बियाण्याचे उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. मलेशिया, इंडोनेशियात पाम, ब्राझील कॅनडा, अर्जेंटिनी यामध्ये सोयाबीन आणि रशिया व युक्रेन देशात सूर्यफूल तेलाचे उत्पादनात यावर्षी मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खाद्यतेलांच्या दरात घसरण होत आहे.

गोड तेल स्वस्त मात्र तेलकट खाणे टाळा

खाद्य तेलाच्या दरात घसरल जरी झाली असेल तरी सर्वसामान्यांनी तेलकट खाणे टाळणे आवश्यक आहे. समोसे पकोडे आणि तळलेले स्नॅक्स पावसाच्या दिवसात आजारपणाचे कारण बनू शकतात. तेलकट आणि तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढते आणि पचनास त्रास होऊ शकतो. त्यामुळे जर एखाद्या तेलाचे दर स्वस्त झाले असले तरी तुम्ही तेलकट खाणे टाळणे आवश्यक आहे.

माझा लाडका भाऊ योजने अंतर्गत तुम्हाला मिळणार दरमहा 10,000 रुपये, येथून ऑनलाइन अर्ज करा

सध्या गोड तेलाचे भाव कायआहेत?

खाद्यतेलपंधरा दिवसांपूर्वीचे दर
(प्रति किलो)
सध्याचे दर
(प्रति किलो)
सोयाबीन115109
पाम तेल112107
सूर्यफूल124119
राईस ब्रान 120115
जवस124119
मोहरी140135
शेंगदाणा तेल175175

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत घसरन झाली आहे. भारतात काम तेलाचे उपलब्ध वाढल्यामुळे तेलाचे दर कमी झाले आहेत. शाळा सुरू असल्याने बाजारात ग्राहकांची गर्दी कमी झाली आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत लग्नकार्य नसल्यामुळे खाद्यतेलाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे तेलाच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. पुढे तर आणखीन कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “नागरिकांसाठी मोठा दिलासा, खाद्यतेल झाले स्वस्त! पहा गोड तेलाचे नवीन दर”

Leave a Comment

error: Content is protected !!