Drought in Maharashtra :959 महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर, मंडळांची यादी येथे पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Drought in Maharashtra : राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे अलीकडेच राज्य सरकारने राज्यांमधील 40 तालुका मध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे. त्यात आता आणखी 959 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे या मंडळांना दुष्काळग्रस्त देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू करण्यात आले आहेत अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन विभाग मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.

मंत्रालयात अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपस्थितीची बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते यावेळी उपस्थितीचे सदस्य तथा सहकारी मंत्री दिलीप वळसे पाटील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन कृषिमंत्री धनंजय मुंडे रोजगार हमी योजना मंत्री संदीप अन भुमरे मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया शेठी पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंढे कृषी विभागाचे सचिव सुनील चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा निहाय दुष्काळ मंडळाची यादी Drought in Maharashtra

अकोला – 50 मंडळ

  • अमरावती -73 मंडळ
  • बुलढाणा -70 मंडळ
  • वाशीम -31 मंडळ
  • यवतमाळ -9 मंडळ
  • छत्रपती संभाजीनगर 50 मंडळ
  • बीड -52 मंडळ
  • हिंगोली- 13 मंडळ
  • जालना -17 मंडळ
  • लातूर – 45 मंडळ
  • नांदेड -23 मंडळ
  • धाराशिव – 28 मंडळ
  • परभणी -37 मंडळ
  • नागपूर -5 मंडळ
  • वर्धा -6 मंडळ
  • अहमदनगर- 96 मंडळ
  • धुळे -28मंडळ
  • जळगाव -67 मंडळ
  • नंदुरबार – 13 मंडळ
  • नाशिक -46 मंडळ
  • कोल्हापूर – 20 मंडळ
  • पुणे-31 मंडळ
  • सांगली -37 मंडळ
  • सातारा – 65 मंडळ
  • सोलापूर – 46 मंडळ
  • अशी एकूण 959 मंडळामध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

Leave a Comment