Maharashtra Drought | राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ दृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या तालुका मध्ये सरकारकडून दुष्काळ परिस्थिती जाहीर करून, शेतकऱ्यांसाठी अंदाजे 1600 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहित्यापूर्वी ही मदत वितरित होईल अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज्यभरामध्ये चालू वर्षात समाधानकारक पाऊस न झाल्याने राज्याच्या काही भागात दुष्काळ दृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे रब्बी हंगाम पूर्णपणे वाया गेले आहे. लाखो शेतकऱ्यांना पिक विम्याच्या माध्यमातून काही प्रमाणात मदत मिळाली अजूनही जवळपास तीन लाख शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून मदत मिळालेली नाही.
दुसरीकडे सोयाबीन, कांदा, कापूस, द्राक्ष, केळी अशा शेतमालांना अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यामध्ये जनावराच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याची टंचाई देखील सध्या जाणू लागले आहे.
जमिनीची पाण्याची पातळी खालवल्याने शेतकऱ्यांना नवीन उत्पादन घेण्यामध्ये मोठी अडचण येत आहे. ऑक्टोबर अखेरस जाहीर झालेल्या दुष्काळाच्या मदतीसाठी शेतकरी प्रतीक्षा करीत आहे. केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी केली पण केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही.
प्रसार माध्यमांमध्ये मिळालेल्या माहितीनुसार लोकसभेच्या आचारसंहिता पूर्वी दुष्काळ जाहीर झालेल्या चाळीस तालुक्यामध्ये अंदाजे 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1600 कोटींची मदत रक्कम जमा होणार आहे. असे सूत्रांमधून माहिती मिळाली आहे.
चाळीस तालुक्यामधील बाधित क्षेत्राचे अहवाल अद्याप मदत व पुनर्वसन विभागाला प्राप्त झालेली नाही. आचारसंहिता पूर्वी तातडीने या तालुक्यांचे प्रस्ताव शासनाला सादर करावे असे निर्देश विभागीय आयुक्तसह जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची ही सांगण्यात आले.
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मिळणार इतकी मदत Farmers in drought affected areas will get so much help
दुष्काळ भागातील शेतकऱ्यांना आता तीन हेक्टर पर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे. 40 तालुक्यामधील कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी साडेआठ हजार रुपये ते बागायती शेतकऱ्यांसाठी 17 हजार रुपये आणि बहुवार्षिक शेतकऱ्यांसाठी 22 हजार पाचशे रुपयांची मदत दिली जाणार आहे.
नोव्हेंबर 2023 नंतर प्रत्येक नैसर्गिक आपत्तीतील बाधित सरकारकडून सध्याच्या प्रमाण दुप्पट मदत मिळणार असल्याचा शासन निर्णय यापूर्वीच दिलेला आहे त्याची अंमलबजावणी या पुढील नैसर्गिक आपत्ती होईल.
हेक्टरी मिळणार अशी मदत Hectares will receive such assistance
- कोरडवाहू जमिनीसाठी 8,500
- बागायती जमिनीसाठी – 17,000
- बहुवार्षिक – 22,500