Compensation for crop damage : महाराष्ट्र राज्यात यावर्षी खूपच दुष्काळ परिस्थिती आहे. आणि खरिपाची पिके ही शेतकऱ्यांच्या हातातून गेलेले असताना, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी अवकाळी पावसामुळे राज्यात फळबाग पिकांचे हे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहेत. आणि मात्र राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करण्यात आली आहे. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे फषपिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 27 हजार रुपये, तर 12 महिने पिकांसाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टरी मदत दिली जाणार आहे. याशिवाय अन्य पिकांच्या नुकसानीसाठी 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टर इतकी मदत दिली जाणार असल्याचे, राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
हे पण वाचा: गुड न्यूज ! महाराष्ट्र आणखी एक वंदे भारत, या दिवशी होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
ऐतिहासिक मदत ( Unseasonal Rain Crop Damaged Farmers)
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. की शेतकऱ्यांना दिली जाणारी ही ऐतिहासिक मदत आहे. आणि याआधी इतकी रक्कम नुकसान भरपाई म्हणून कधीही देण्यात आलेली नाही. व यापूर्वी शेतकऱ्यांना केवळ दोन हेक्टरपर्यंत मदत दिली जात होती. मात्र यावेळी राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या या निर्णयासाठी शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आभार मानले आहे.
अशाच नवीन नवीन माहितीसाठी व मराठी बातम्यांसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
सर्व पिकांसाठी भरपाई मिळणार
राज्यातील नैसर्गिक आपत्तीने घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना यामुळे मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. कारण यावर्षीचा खरीप हंगाम असो, वा अवकाळी पावसाने घेतलेला रब्बी हंगाम असो, सर्व शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे. यावर्षी पावसाअभावी कापूस, सोयाबीन, धान तर अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या मदतीची राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आलेली आहे. असे मुंडे यांनी म्हटले आहे.
खरीप पिकांसाठी सरसकट मदत
महाराष्ट्र राज्यात कापूस आणि सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते, याशिवाय त्यात आंतरपीक म्हणून तुर, मुग आणि उडीद यांची लागवड केली जाते. मात्र या सर्व पिकांना सरसकट एका शेतकऱ्याला तीन हेक्टर साठी मदत दिली जाईल. या पिकांसाठी प्रतिष्ठान 13 हजार 600 रुपये इतकी रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे. असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. व शेतकऱ्यांना या पिकांसाठी एक रुपया पिक विमा भरण्यासाठी लागणार आहे, असे म्हणले आहे.