Cotton Soybean Subsidy: राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. ही अनुदान दोन हेक्टरच्या तुलनेत शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. त्यानंतर 30 सप्टेंबर रोजी एकाच टप्प्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2300 कोटी रुपये वितरित करण्यात आले होते. या आंदोलनासाठी राज्यातील 96 लाख पात्र खातेदार असून यातील 80 लाख व्यक्ती आणि 16 लाख संयुक्त खाते आहेत. पहिल्या टप्प्यात 2300 कोटी रुपयांचे अनुदान वाटप केल्यानंतर अनुदान वाटपाची गती मंदावली आहे.
कृषी आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार अनुदान वाटप सुरू झाल्याच्या चार महिन्यानंतर म्हणजेच 27 जानेवारी रोजी 96 लाखापैकी 72 लाख 12 हजार खातेदारांना 2808 कोटी 46 लाख रुपयांचे अनुदान वाटप झाले आहे. एकूण 57 लाख शेतकऱ्यांनी आतापर्यंत या अनुदानाचा लाभ घेतला आहे. पहिल्याच टप्प्यात म्हणजे 30 सप्टेंबर रोजी जवळपास 50 लाख खातेदारांना आणि 43 लाख शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात आले होते पण चार महिन्यानंतरही 96 पैकी 73 लाख खातेदारांनाच अनुदान वाटप झाले आहे. उर्वरित खातेदार अजून देखील कापूस आणि सोयाबीन अनुदान पासून वंचित आहेत.
अनुदान वितरणाची गती का मंदावली?
या अनुदानासाठी पात्र होण्यासाठी एपिक पाहणी आणि आधार संमती पत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. पण 16 लाख संयुक्त खातेदारांचे आधार संमती पत्र कृषी विभागाला मिळाले नसल्यामुळे त्या खात्यांचे अनुदान अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. संयुक्त खातेदारांना एकमेकाची संमती घेत एकाच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासंदर्भात संमती पत्र द्यावे लागत आहे. मात्र हे संमती पत्र अजून मिळाले नसल्यामुळे अनुदान वाटप थांबली आहे. Cotton Soybean Subsidy
जसे जसे संयुक्त खातेदारांचे आधार संमती पत्र कृषी विभागाला मिळतील तसे तसे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर आधार संमती पत्र घेऊन या अनुदानाचा लाभ घ्यावा असे कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. तुम्हाला देखील अजून सोयाबीन कापूस अनुदान मिळाले नसेल तर त्वरित जवळील कृषी विभागात जाऊन संमती पत्र द्या, जेणेकरून अनुदान तुमच्या खात्यात त्वरित जमा होईल.
1 thought on “कापूस सोयाबीन अनुदान तुम्हाला मिळाले का? अनुदान वितरणाची गति मंदावली…”