Cotton Price Today : नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. तरीदेखील कापसाला समाधानकारक असा भाव मिळत नाही. गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये कांदा सोयाबीन आणि कापसाचे भाव पडलेले आहेत.
सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणी सापडला आहे. सोयाबीन कांदा कापसाला योग्य भाव देण्यात येईल अशी मागणी शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणामध्ये केली जात आहे.
शेत पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गात आक्रमक झालेला आहे. दरम्यान परभणी आणि जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या कारणासाठी रस्ता रोको आंदोलन सुरू केलेले आहे.
शेतकऱ्यांचा कापूस विक्री करताना थेट कापुस घेतला जात नाही. येथील व्यापारी बाहेर खाजगी मध्ये कापूस विक्री करायला बळजबरी करतात. अशी तक्रार शेतकऱ्यांमधून होत आहे. ही खरेदी बाजार समिती यांच्या माध्यमातून अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे.
व तसेच जळगाव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी अर्धा तास रस्ता अडून धरला यावेळी शेतकऱ्यांच्या आधारामुळे गोंधळ उडाला पोलिसांनी मध्यस्थी करत शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
कापसाला पंधरा हजार रुपये भाव द्या
राज्यामध्ये कापसाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणी सापडलेला आहे. कापसाला प्रतिकूल 15000 रुपये भाव देऊन शासनाने तालुकास्तरावर खरेदी करावी. नाफेडच्या माध्यमातून शासनाने कांदा तीन हजार पाचशे रुपये भावने खरेदी करावे. लवकर शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्क आदा करावी या सर्व विविध मागण्यांसाठी जळगाव शेतकरी आक्रमक झाले होते.