Friday

14-03-2025 Vol 19

Cotton Price : पांढऱ्या सोन्याला भाव कधी मिळणार? दरवाढीच्या अपेक्षेने 75 टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरातच

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Price : पांढऱ्या सोन्याचा जिल्हा अशी यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. मात्र नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा कापूस वाला झाला आणि दर घसरला. कापसाचा MSP दर सात हजार वीस रुपये क्विंटल असून शेतकऱ्यांचा कापूस हा व्यापारी सहा हजार तीनशे ते सहा हजार पाचशे भावाने खरेदी करत आहेत. अशातच मोजक्याच जिनिंग प्रेसिंग सुरू झाले. नाफेड आणि CCI ची खरेदी हि जिल्ह्यात अद्यापही सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांच्या घरी कापूस पडून आहे. कापसाला भाव नसल्याने जवळपास 75 टक्के कापूस हा अजूनही शेतकऱ्यांच्या घरीच असल्याचे म्हटले जात आहे.

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. काही पिकांचे नुकसान झाले तर हाताशी आलेला शेतमालाचा भाव घसरला. यवतमाळ जिल्ह्यात चार लाख क्षेत्र क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली सुरुवातीला अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले. यातून वाचलेला कापूस आता लावल्याने शेतकऱ्यांना पुन्हा संकटाला समोर जावे लागत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. मात्र कापसाचे दर हजार ते दीड हजार रुपये प्रति क्विंटल नाही कमी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

गती वर्षी 12000 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी होत असलेला कापूस यावर्षी केवळ 6500 रुपये प्रति क्विंटल व्यापारी खरेदी करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शासनाने ठरवलेल्या MPS दराप्रमाणे कापूस खरेदी करण्यासाठी पणन महासंघ आणि CCI चे केंद्र सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. याद्वारे खरेदी सुरू झाल्यास कापसाला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांचे आहे. पावसाचा पडलेला मोठा खंड त्यानंतर कापसावर आलेला लाल आणि मर रोगाचा प्रभाव प्रादुर्भाव यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणी सापडला आहे. उत्पादन खर्चही निघणार असल्याने शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

कापसाला किमान दहा हजार रुपयांचा दर मिळावा ही मागणी

काही भागात कापसावर लाल रोगाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. कपाशीचे अधिक नुकसान होऊन नये यासाठी शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर वेचणी करण्यात आली असून, यंदा कपाशीला चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र सध्या कापाशीला कमी दर मिळत असून उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान कापसाला किमान दहा हजार क्विंटल तरी भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *