Cotton Price: चालू वर्ष उत्पादन कमी झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल अशी आशा होती. परंतु मुख्य कापणीच्या कालावधीनंतर किमतीत प्रचंड घसरण होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या कापसाचा भाव 7000 रुपये प्रति क्विंटर च्या देखील खाली जाताना दिसून येत आहे.
यावर्षीच्या हंगामी च्या सुरुवात पासूनच कापसाला चांगला दर मिळेल अशी शेतकऱ्याला अपेक्षा होती. जरी पीक दृष्टिकोन सकारात्मक दिसत असला तरी विनाशकारी अतिवृष्टी आणि वादळामुळे उत्पादन खूपच कमी झाले आहे.
वेळेवर पाऊस न झाल्यामुळे उत्पन्नात घट आलेली आहे. जोरदार वारा आणि पाऊस वादळामुळे अतिवृष्टीमुळे अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान आणखीन वाढले आहे. उत्पन्नात मोठी घट झाली आहे गेल्या वर्षी कापूस शेवटच्या क्षणी 12000 रुपये प्रतिक्विंटल वर गेला होता.
हे पण वाचा :-शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! निर्यात बंदीनंतर केंद्राकडून पुन्हा कांदा खरेदीची तयारी
Cotton Price
यावर्षी खाजगी बाजार उघडले तेव्हा किमतीला सुरुवात झाली 10000 प्रतिक्विंटल दरापासून त्यामुळे यावर्षी दर आणखीन वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र आता भाव वाढी न होता भावात घसरण झाले आहे. आता भावात मोठी घसरण होऊन सुमारे 6900 रुपये प्रतिक्विंटल झाले आहे.
कापसाच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्याच्या अशा निराशात बदलले आहेत. मागणी वाढली आहे त्यामुळे किमती वाढतील अशी त्यांची अपेक्षा होती परंतु हवामानाच्या घटनानी गोष्टींचा नाश केला. कमी उत्पादन आणि घसरलेला भाव म्हणजे यंदाचा कापूस हंगामी शेतकऱ्यांच्या हातातून निसटला आहे.
कापसाच्या भावात तेथे काही दिवसात म्हणजेच जानेवारी महिन्यात काही बदल होऊ शकतात. जाणकार सांगतात जर जानेवारी महिन्यात अवकाळी पाऊस नाही आला तर कापसाला चांगला भाव मिळू शकतो. म्हणजेच जानेवारी महिन्यात कापूस 10000 रुपये प्रतिक्विंटल जाऊ शकतो. ज्या शेतकऱ्याने आपला कापूस भाव वाढीच्या अपेक्षा ने ठेवला आहे त्या शेतकऱ्यांना नक्कीच चांगला भाव मिळू शकतो.
महत्त्वाची माहिती:- त्याचप्रमाणे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या नवीन किंवा जुन्या सरकारी योजनांची माहिती आम्ही www.digitalpor.in या वेबसाईटच्या माध्यमातून देत राहू, त्यामुळे आमच्या वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका.
तुम्ही खाली दिलेल्या सोशल मीडिया आयकॉनवर क्लिक करून आमच्याशी कनेक्ट होऊ शकता जेणेकरून नवीन आगामी योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल.
असाच नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कृपया शेअर करा.
हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद….